Plastic-bag
Plastic-bag 
नाशिक

नाशिक : प्लॅस्टिक वापरल्यास खावी लागेल जेलची हवा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात प्लॅस्टिक वापराला बंदी असूनही मोठ्या प्रमाणात वापर होत असून, महापालिकेचे भरारी पथकदेखील याबाबत कार्यवाही करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता पुन्हा ॲक्शन मोडमध्ये येत, ७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिक साहित्य वापरावर शंभर टक्के बंदीचा नारा देतानाच पंचवीस हजार रुपये दंडासह तीन महिने जेलची हवा खावी लागेल, असा सज्जड दमच आरोग्य विभागाने दिला आहे.

केंद्रीय पर्यावरण विभागाने ऑगष्ट २०२१ मध्ये प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापनाचा सुधारित नियम लागु केला आहे. त्याच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून महापालिकेने अधिसुचना जारी केली. महाराष्ट्रात सर्वप्रथम प्लॅस्टीक बंदी लागु करताना पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांसह वस्तूंवर बंदी घातली होती. त्यानंतर आता नव्या नियमानुसार ३० सप्टेंबरपासून ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांसह, प्लास्टिकच्या अन्य वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे.

पुढील टप्प्यात ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक साहित्यावर बंदी घातली जाणार आहे. त्यानुसार महापालिका हद्दीमध्ये प्लॅस्टीक बंदी नियमाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तू व साहित्याचा वापर, वाहतूक किंवा साठवणूक केल्याचे आढळून आल्यास दंड व शिक्षा केली जाणार आहे. प्लास्टीक वापरासंदर्भात पहिल्यांदा गुन्हा घडल्यास पाच हजार रुपये, दुसरा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा घडल्यास पंचवीस हजार रुपये व तीन महिने कारावास अशी दंड व शिक्षेची तरतुद आहे.

शहरात या वस्तूंवर बंदी

सजावटीसाठी वापरात आणलेले प्लॅस्टिक व थर्माकोल, मिठाईचे बॉक्स, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लेटस् कप, ग्लासेस, कटलरी साहित्य, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकीटं, प्लास्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, चमचे, चाकू, पिण्यासाठीच्या स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या. शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, कचरा व नर्सरीसाठी वापरात येत असेलल्या पिशव्यासोडून सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या, बाउल, डबे आदी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT