quite held on Friday at the Panchayat Samiti office. esakal
नाशिक

Nashik News: इगतपुरी पंचायत समितीला गटविकासाधिकारी देणार का? नागरिकांची कामे खोळंबली

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर : येथील पंचायत समितीतील गटविकास अधिकारीपदही रिक्त आहे. यामुळे अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन सुरू झाल्याने कोणी गटविकास अधिकारी देणार का, अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांनावर आली आहे. (Igatpuri Panchayat Samiti given Group Development Officer Citizens work disrupted Nashik News)

प्रत्येक ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक गाव आणि सरपंच यामधील विकासात्मक दुवा समजला जातो. अनेक ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने गावविकासाला खीळ बसली आहे. बरेचशे ग्रामसेवक नाशिक व नाशिक रोडहून अप-डाऊन करतात.

त्यामुळे गावाचा विकास कसा होणार, असा सवाल आता ग्रामस्थ करीत आहेत. त्यातच गटविकास अधिकारीच नसल्याने ग्रामपंचायतींना ग्रामसेवक पूर्णवेळ देत नाहीत.

जिल्हा परिषदेंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजना आदिवासी भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील, असे शासनाकडून पाहिले जाते.

त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले, पण मुख्यालयी राहत असल्याचे खोटे दाखले सादर करीत असतात. तयाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचा काही ग्रामसेवकांकडे पदभार असल्याने स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन या दिवशी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती असते. बरेचदा ग्रामसभा आणि मासिक सभेला ग्रामसेवक हजर राहत नाहीत.

गावातील कोणता वॉर्ड कुठे आहे, याची साधी माहितीही त्यांच्याकडे नसते. गावात कोणत्या समस्या आहेत, कोणती कामे करायची आहेत, याची साधी कल्पना नसते. कारण गावात काही ग्रामसेवक कधी फिरकूनही पाहत नाहीत.

एका ग्रामसेवकांवर तीन ग्रामपंचायतीचा भार

पंचायत समितींतर्गत ९४ ग्रामपंचायतीचा समावेश आहेत. ८६ ग्रामसेवक आहेत, तर ८ पदे रिक्त आहेत. ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्याकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा पदभार असल्याने ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’, अशी स्थिती आहे.

"गाव म्हटले, की समस्यांचा जणू पाढाच असतो. काही ग्रामपंचायतींमध्ये महिना महिना ग्रामसेवकांचे तोंड पाहिले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यातच काही ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी नाशिक व नाशिक रोडहून अप डाऊन करतात. आदिवासी भागात आठवड्यातून एखाद्या दिवशी ग्रामसेवक आला, तर ग्रामस्थांना कळतही नाही. मुख्यालयी कुणीही राहत नसल्याने विकासकामे करण्याला ब्रेक लागला आहे."-भाऊराव वीर, निरपण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT