A team of Crime Branch Unit I along with suspect Umesh Lunge, who was arrested on suspicion of selling illegal gutkha in the city. esakal
नाशिक

Nashik Crime: साडेचार लाखांचा अवैध गुटखा हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : राज्यात प्रतिबंध असलेला सुमारे साडे चार लाखांचा गुटखा हस्तगत करण्यात गुन्हे युनीट एकच्या पथकाला यश आले.

याप्रकरणी विडी कामगार वसाहतीत एकाला अटक करीत त्याच्याकडून ४ लाख ३१ हजार ६७० रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला. उमेश बाळू लुंगे (वय ३०, स्वामी विवेकानंद नगर विडी कामगार वसाहत ) असे संशयिताचे नाव आहे. (Illegal Gutkha worth four half lakh seized Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांनी दिलेली माहीती अशी काल मंगळवारी (ता.१५) गुन्हे शाखा युनीट एकचे पोलिस अंमलदार मुक्तार निहाल शेख यांना मिळालेल्या माहीतीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विडी कामगार वसाहतीत हनुमान मंदीरामागील खोलीत तपासणी केली असता, तेथे राज्यात प्रतिबंधित असलेला गुटका सुगंधित तंबाखू, पानमसाला असा सुमारे ४ लाख ३१ हजाराचा मुद्देमालाचा साठा केला असल्याचे आढळले.

याप्रकरणी पोलिसांनी संशयितासह मुद्देमाल ताब्यात घेत कारवाई केली. त्यात, पोलिस हवालदार रामदास भडांगे यांच्या फिर्यादीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, उपनिरीक्षक्ष चेतन श्रीवंत, प्रविण वाघमारे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल देवरे, रामदास भडांगे, मुक्तार शेख, राजेश राठोड आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT