The ongoing work of silt sealing is taking action by the municipal employees esakal
नाशिक

Nashik News : अतिक्रमण विभागाकडून गाळा सील

रहिवासी वापर म्हणून असलेल्या फ्लॅटमध्ये अनधिकृत गाळा तयार करून व्यावसायिक वापर सुरू होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रहिवासी वापर म्हणून असलेल्या फ्लॅटमध्ये अनधिकृत गाळा तयार करून व्यावसायिक वापर सुरू होता. महापालिका नगररचना आणि अतिक्रमण पथकाने शुक्रवारी (ता. १९) दुपारी कारवाई करत संबंधित गाळा सील केला.

भद्रकाली टाकसाळ लेन येथे भरत कटारिया यांच्याकडून फ्लॅटमध्ये अनधिकृत गाळा तयार करून व्यावसायिक वापर सुरू होता. (illegal shop Seal from Encroachment Department nashik news)

महापालिकेकडून याबाबत कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तक्रार प्राप्त झाल्याने नगररचना विभागाकडून माहिती घेऊन खात्री करण्यात आली. फ्लॅटच्या जिन्याजवळ अनधिकृत गाळा तयार केल्याचे आढळून आले.

शुक्रवारी उपायुक्त नितीन नेर यांच्या आदेशाने विभागीय अधिकारी योगेश रकटे आणि राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनात नगररचना विभागाचे अभियंता श्री. जोपुळे अतिक्रमण विभागाचे लिपिक विनायक जाधव, पश्चिम विभागाचे अतिक्रमण विभाग प्रमुख प्रवीण बागूल तसेच अतिक्रमण पथक यांच्याकडून कारवाई करत भद्रकाली टाकसाळ लेन येथील कटारिया यांचे अनधिकृत गाळा सील करण्यात आले.

पोलिसांच्या उपस्थितीत पूर्व आणि पश्चिम विभागाकडून कारवाई करण्यात आली. सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत कारवाई सुरू होती. गळा सील करण्यापूर्वी प्रथम फ्लॅटमधून असलेला जिना प्लायवूड ठोकून गळ्यातील मार्ग बंद करण्यात आला. त्यानंतर बाहेरून गाळा सील करण्यात आला. नगररचना विभागाकडून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT