company siled.jpg
company siled.jpg 
नाशिक

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेश; दोन सायजिंग, दोन गिट्टी कारखाने सील! 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) शहर व परिसरात प्रदूषणाला कारणीभूत असलेले द्याने शिवारातील चौधरी व प्रधान या दोन सायजिंग तसेच द्याने शिवारातील फुरकान प्लॅस्टिक व दरेगाव शिवारातील पाशा प्लॅस्टिक अशा चार युनिटला गुरुवारी (ता. 6) महसूल, पोलिस, महापालिका, महावितरण व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने सील ठोकले. 

185 प्लॅस्टिक गिट्टी कारखाने व 28 सायजिंगला क्‍लोजर नोटीस

सायजिंग व प्लॅस्टिक गिट्टी कारखाने सील करण्याची प्रक्रिया पोलिस बंदोबस्तात पार पडली. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. आगामी काळात रोज टप्प्याटप्प्याने कारवाई होणार आहे. लवादाने शहरातील प्लॅस्टिक व सायजिंग प्रदूषणाची गंभीर दखल घेत 185 प्लॅस्टिक गिट्टी कारखाने व 28 सायजिंगला क्‍लोजर नोटीस बजावली होती. महापालिका व स्थानिक प्रशासनाने कागदोपत्री कारवाई केल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवादाला पाठविल्यानंतर लवादाने ठोस कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी सकाळी दहापासून सायंकाळी पाचपर्यंत ही कारवाई करण्यात आली. सायजिंग व कारखान्यांना सील ठोकतानाच महावितरणने संबंधित युनिटचे वीजमीटर, वीजवाहिनी व केबल काढून घेतल्या. 

कारवाईत अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा इशारा

बुधवारी (ता. 5) सुसंवाद हॉलमध्ये प्लॅस्टिक असोसिएशन व सायजिंग ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थानिक प्रशासनाने संबंधितांना 
लवादाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणार असून, त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाने कारवाईत अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला होता. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, आयुक्त किशोर बोर्डे आदींच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार चंद्रजित राजपूत, मंडलाधिकारी एम. एच. मोरे, द्याने तलाठी सी. टी. महाले, महापालिका नगररचना अभियंता संजय जाधव, अतिक्रमण अधीक्षक राजू खैरनार, इमारत पर्यवेक्षक मंगेश गवांदे, प्रभाग अधिकारी श्‍याम बुरकुल, किशोर गिडगे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात, गुलाबराव पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मनीष महाजन, श्री. रेदासनी आदींसह महावितरणच्या पथकाने ही कारवाई केली. 

पाच सदस्यीय समिती घेणार आढावा 

शहरात धूळ, धूर, जल, मल, प्लॅस्टिक, कचरा प्रदूषण गंभीर झाले आहे. प्रदूषणा विरोधात मालेगाव ग्रीन ड्राइव्हचे निमंत्रक सामाजिक कार्यकर्ते कलीम अब्दुल्ला 
यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची लवादाने गंभीर दखल घेतली. लवादाच्या आदेशावरूनच दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी शहरात भेट देऊन पाहणी करून गेले. या अधिकाऱ्यांच्या समितीने मराठा दरबार हॉलमध्ये बैठक घेतली होती. मात्र, बैठकीत मोठा गोंधळ झाला होता. राष्ट्रीय हरित लवादासमोर 24 फेब्रुवारीला याबाबत अंतिम सुनावणी होण्याची शक्‍यता असून, तत्पूर्वी संबंधित सायजिंग व प्लॅस्टिक गिट्टी कारखान्यांवर कारवाई करून तसा अहवाल सादर करण्यात येणार आहे. महसूल, पोलिस, महापालिका, महावितरण व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींची पाच सदस्यीय समिती रोज या कारवाईचा आढावा घेणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT