Nashik Multimodel Logistics Park esakal
नाशिक

नाशिकमध्ये होणाऱ्या मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कसाठी महत्त्वाची बैठक

विक्रांत मते

नाशिक : नाशिकमध्ये मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारला जाणार असून, त्यासंदर्भात केंद्रीय नगरविकास मंत्र्यांसोबत महत्त्वाची ऑनलाइन बैठक मंगळवारी (ता. ८) होणार आहे. या बैठकीत जागेची चाचपणी, महापालिकेकडून पुरविल्या जाणाऱ्या सुविधा आदींबाबत चर्चा होणार आहे.


केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी व राज्यमंत्री कौशल किशोरे नवी दिल्लीतील नगरविकास मंत्रालयाच्या निर्माण भवनमधून ऑनलाइन संवाद साधणार आहेत. नाशिकबरोबरच वर्धा, मुंबई व ठाणे जिल्ह्यातील शासकीय संस्थांचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. कच्चा, पक्क्या मालाची वाहतूक जलदगतीने होण्याबरोबरच वाढत्या शहरांमध्ये वाहतुकीच्या प्रश्‍नांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्या कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कची संकल्पना मांडली आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार केंद्रीय नगरविकास विभागाने मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT