crime news esakal
नाशिक

शहरातील सराईत गुन्हेगार जेरबंद; गावठी पिस्तुल, 2 जिवंत काडतूस जप्त

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील नागछाप झोपडपट्टी सिमेंट रस्त्यावर शहर पोलिसांनी सापळा रचून शाहीद अख्तर शकील अहमद उर्फ अख्तर काल्या (वय ३५, रा. अख्तराबाद, फार्मसी कॉलेज मागे) या सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले.

त्याचा साथीदार व अन्य एक संशयित शेख रब्बानी शेख कादीर (वय ३२, रा. गुलशेरनगर) हा मात्र फरार झाला. पोलिसांनी अख्तर काल्याजवळून २५ हजार रुपये किंमतीची एक गावठी पिस्तुल व चारशे रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस असा २५ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला. (Imprisoned innkeepers in city Gavathi pistol 2 live cartridges seized Nashik news)

पोलिस निरीक्षक सुरेश घुसर, उपनिरीक्षक सुनील आहेर यांना दोघे संशयित सराईत गुन्हेगार नागछाप झोपडपट्टी भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. घुसर, श्री. आहेर, पोलिस नाईक आत्माराम पाटील, विशाल गोसावी, अमोल शिंदे व ठाकूर यांनी सापळा रचून अख्तर काल्याला अटक केली.

रब्बानी फरार झाला. पथकाने त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी पिस्तुल व काडतूस मिळून आले. दोघेजण सराईत गुन्हेगार असून पोलिस त्यांच्या मागावर होते. शहर पोलिस ठाण्यात पोलिस नाईक पाटील यांच्या तक्रारीवरुन दोघांविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलमान्वये अवैधरित्या विनापरवाना शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अख्तर काल्याला अटक केल्यानंतर उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव व पोलिस निरीक्षक घुसर यांनी त्याची कसून चौकशी केली. फरार झालेल्या रब्बानीचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT