cremation wood 
नाशिक

मृतांचा आकडा वाढला! 15 दिवसात अंत्यसंस्कारासाठी ६१२ टन लाकूड

जानेवारीच्या तुलनेत लाकडाचा वापर तिप्पट झाला आहे.

विक्रांत मते

नाशिक : शहरात कोरोना संसर्गाचा वेग वाढत असल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून मान्य केले जात असले तरी मृत्यूंच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. ही बाब मात्र दुर्लक्षित केली जात आहे. परंतु, जानेवारी ते १५ एप्रिलपर्यंत तब्बल एक हजार ६४५ टन लाकडाचा वापर मृतदेह जाळण्यासाठी झाला. १ ते १५ एप्रिलदरम्यान तब्बल ६१२ टन लाकडाचा वापर झाला आहे. जानेवारीच्या तुलनेत लाकडाचा वापर तिप्पट झाला आहे. जानेवारीत २५४ टन लाकडे मृतदेह जाळण्यासाठी वापरण्यात आली.

महापालिकेतर्फे अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकूडफाटा व अन्य साहित्य दिले जाते. एका मृतदेहासाठी सात मण लाकडे दिली जातात. कोरोना संसर्गापूर्वी म्हणजे गेल्या वर्षाच्या मार्चपूर्वी साधारण महिन्याला सव्वाशे टन लाकूड लागत होते. परंतु डिसेंबरपर्यंत त्यात दुपटीने वाढ झाली, तर जानेवारी २०२१ ते १५ एप्रिल २०२१ या कालावधीत तब्बल तिप्पट लाकूडफाटा लागला आहे. अद्यापही लाकडाची मागणी वाढत आहे. सर्वाधिक लाकूड पंचवटी व पूर्व विभागात लागत असून, पूर्व विभागात तीन महिन्यांत ५०२ टन लाकडाचा वापर झाला आहे. जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या तीन महिन्यांच्या कालावधीत सरासरी ३४४ टन लाकूड अंत्यविधीसाठी लागले. १ ते १५ एप्रिलदरम्यान ६१२ टन लाकडाचा वापर झाल्याने पंधरा दिवसांत मृतांचा आकडा वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

लाकडाचा विभागनिहाय असा झाला वापर

विभाग जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल (१५ पर्यंत) एकूण (टन)

पंचवटी ७० ७० २०० १५० ४९०

नाशिक रोड ३० ३९ ७० १३० २६९

पूर्व ९३ ९२ १५० १६७ ५०२

सिडको ४३ ४७ ६० १२० २७०

सातपूर १८ २१ ३० ४५ ११४

एकूण २५४ २६९ ५१० ६१२ १६४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Lalit Modi and Vijay Mallya : Video-ललित मोदी अन् विजय मल्ल्याचा लंडनमधील पार्टीतील मजा-मस्ती व्हिडिओ तुम्ही पाहिली का?

Libra Soulmate Match: तुळ राशीची 'सोलमेट' कोण? जाणून घ्या राशीगणनेनुसार

SCROLL FOR NEXT