Nashik district Pomegranate orchards in danger Due to deadly disease esakal
नाशिक

तेल्या, मर रोगाने कसमादेतील डाळिंबबागा धोक्यात!

मोठाभाऊ पगार

ज्या डाळिंबाने कितीतरी शेतकऱ्यांना सधन बनवले ते डाळिंब पीक रोगांना बळी पडत आहे. तेल्यामुळे फळे खराब होत असल्याने व मर रोगामुळे बागांमधील झाडे वाळू लागल्याने बहुतांश शेतकरी डाळिंबाच्या बागा उपटून टाकत आहेत.

देवळा (जि. नाशिक) : कसमादे भागातील डाळिंब बागांवर यावर्षी तेल्यासह मर व इतर बुरशीजन्य रोगांनी आक्रमण केल्याने डाळिंबाचा गोडवा हरवू लागला आहे. ज्या डाळिंबाने कितीतरी शेतकऱ्यांना सधन बनवले ते डाळिंब पीक रोगांना बळी पडत आहे. तेल्यामुळे फळे खराब होत असल्याने व मर रोगामुळे बागांमधील झाडे वाळू लागल्याने बहुतांश शेतकरी डाळिंबाच्या बागा उपटून टाकत आहेत.

तेल्या, मर रोगाने डाळिंबबागा धोक्यात!

एक काळ असा होता की, कसमादे भागात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व्हायचे. एक नगदी पीक म्हणून डाळिंबाकडे पहिले जात असे. येथील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या उत्पादनातून मोठी प्रगती साधली. परंतु, गेल्या सात - आठ वर्षांपासून तेलकट डागयुक्त तेल्या, मर, प्लेग आदी रोगांनी थैमान घातल्याने जवळपास ७५ टक्के शेतकऱ्यांनी डाळिंबबागा उपटत डाळिंब शेतीकडे पाठ फिरवली आहे. एकीकडे कांदा, टोमॅटो, मिरची भाव खात असतांना दुसरीकडे डाळिंबाचे पीक दुर्लक्षित होत असल्याचे चित्र आहे. काही मोजके शेतकरी असे आहेत की जे या अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डाळिंब शेती फुलवत आहेत. परंतु, तीन-चार वर्षांपासून उत्पादन, गुणवत्ता व भाव या तिन्ही पातळींवर डाळिंब मार खात आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हताश झाले असून, या भागात डाळिंब शेतीबाबत उदासीनता वाढू लागली आहे. हा धोका ओळखत व वैतागत शेतकरी बागा उपटून काढत आहेत. त्यात नवीन लागवड अल्प असल्याने डाळिंबाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी कमी होत आहे.

डाळिंबाच्या क्षेत्रात घट…

२००७-०८ मध्ये देवळा तालुक्यात डाळिंबाचे लागवडीखालील क्षेत्र ६३४० हेक्टर इतके होते. २०१६-१७ मध्ये निम्म्यापेक्षा कमी म्हणजे २५०० हेक्टर इतकेच राहिले आणि आता यावर्षी हे प्रमाण ८०० ते ९०० हेक्टर इतके झाले आहे. कसमादे भागातील इतर तालुक्यांतही असेच घटते प्रमाण दिसून येत आहे.

संशोधन करण्याची गरज…

तेल्या, मर, प्लेग या व इतर रोगांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. महागडी खते व औषधे, वाढलेली मजुरी यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने ‘नको त्या डाळिंबबागा’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दोन-तीन वर्षांपासून डाळिंबाचे दरही २० ते ५० रुपये या दरम्यानच हेलकावे खात राहिले. डाळिंबाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी या रोगांवर संशोधन होण्याची व प्रभावी औषधे शोधण्याचे आव्हान कृषी विभागापुढे आहे. कारण, या रोगांचा नायनाट झाल्याशिवाय डाळिंबबागा फुलवणे अवघड आहे.

''माझी तीन एकर डाळिंबशेती होती. तेल्या, मर, प्लेग या रोगांना वैतागून डाळिंबाची सर्व झाडे उपटून फेकली. आता डाळिंबाचा नाद सोडला आहे. याबाबत संशोधन होण्याची गरज आहे.'' - जगन्नाथ पवार, वाखारी (ता. देवळा)

''जमिनीत बुरशीचे प्रमाण वाढल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावर्षी डाळिंब बागात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. डाळिंब बागांमधील झाडांची संख्या विरळ होऊ लागल्याने नाईलाजास्तव बागा उपटून काढाव्या लागत आहेत.'' - किरण भामरे, शेतकरी, खुंटेवाडी (ता. देवळा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT