no helmet no petrol in nashik Sakal
नाशिक

नाशिक : पेट्रोल पंपावर हेल्‍मेटसाठी विनवण्या सुरूच

अरुण मलाणी

नाशिक : स्‍वातंत्र्य दिनापासून ‘नो हेल्‍मेट, नो पेट्रोल’ च्‍या अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. अद्यापही काही नाशिककरांनी मोहिमेचे गांभीर्य ओळखलेले दिसत नाही. मंगळवारी (ता.१७) दिवसभर विनाहेल्‍मेट पंपावर आलेले वाहनचालक हेल्‍मेटसाठी इतरांना विनवण्या करत असतानाचे दृश्य शहरातील विविध पेट्रोल पंपावर बघावयास मिळत आहे.

पोलिस आयुक्‍त दीपक पांडे यांच्‍या संकल्‍पनेतून ‘नो हेल्‍मेट, नो पेट्रोल’ उपक्रम राबविला जात आहे. रस्‍ते अपघातात मृत्‍यूचे प्रमाण घटविण्याच्‍या उद्देशाने व हेल्‍मेटचा वापर वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. परंतु काही बेशिस्‍त वाहनचालकांमध्ये अद्यापही गांभीर्य नसल्‍याची परिस्थिती आहे. अशात केवळ पेट्रोल मिळविण्यापुरता पंपावर अन्‍य वाहनचालकाकडून हेल्‍मेटची विनवणी करतानाचे चित्र सध्या सर्रासपणे बघायला मिळत आहे.

काही ठिकाणी कर्मचाऱ्यांशी हुज्‍जत

काही पंपांवर हेल्‍मेटविना पेट्रोल देण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांशी हुज्‍जत घातली जात असल्‍याचेही प्रकार अनुभवायला आले. तर काही पंपाच्‍या आवारात तैनात पोलिसांकडून विनाहेल्‍मेट चालकांना खाक्‍या दाखवत जाब विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: महत्त्वाची बातमी! कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार; केंद्र सरकार ईपीएफओमध्ये मोठा बदल करणार

माझ्या तोंडात शिव्या येतायत... कुंभमेळ्यासाठी झाडं तोडणाऱ्या सरकारला सयाजी शिंदेंनी विचारला जाब; आवाज उठवणाऱ्याला दाबलं जातंय...

Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होणार? ५० टक्क्यांवरील आरक्षण ‘ट्रिपल टेस्ट’च्या कचाट्यात!

Latest Marathi News Live Update : अनगर नगरपंचायत तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झाली

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

SCROLL FOR NEXT