Accident esakal
नाशिक

अपघातात 3 जण ठार, ठेकेदारासह चालकावर गुन्हा दाखल करायची मागणी

अरुण भामरे

अंतापूर (जि. नाशिक) : ताहाराबाद- पिंपळनेर रस्त्यावरील राजापूरजवळ दोन दुचाकींना भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत ताहाराबाद येथील पिता-पुत्र व साक्री तालुक्यातील धोंगडे दिगर येथील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ४) रात्री घडली. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

ताहाराबाद येथील एकनाथ बळिराम नंदन (वय ६०), योगेश नंदन (वय ३०) हे दुचाकीने (एमएच ४१, ९६८५) व धोंगडे येथील विष्णू पवार (वय ५३) व बहीण रेखाबाई गांगुर्डे (वय ५०, रा. देगाव) हे दुचाकीने (एमएच ४१, २५६) शनिवारी सायंकाळच्या सुमारास पिंपळनेरच्या दिशेने जात होते. समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन्ही दुचाकींना राजापूर गावाजवळ धडक दिली.

या घटनेत एकनाथ नंदन, योगेश नंदन व विष्णू पवार जागीच ठार झाले. तर रेखाबाई गांगुर्डे या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर ताहाराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जायखेड्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ रसाळ, हवालदार डी. पी. भगत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. रविवारी (ता. ५) ताहाराबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

पिंपळनेर- सटाणा रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत दोन डझन निरपराध व्यक्तींचा जीव गेला आहे. संबंधित विभागाने रस्ता काम करणाऱ्या ठेकेदार व वाहनचालकाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पिंपळकोठे येथील सोसायटीचे माजी सभापती पंकज भामरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. रस्त्याचे काम नियमबाह्य पद्धतीने होत आहे. ठिकठिकाणी अर्धवट काम सोडल्याने व समप्रमाणात भर न टाकल्याने वारंवार अपघात होत आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते गजानन साळवे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात २१६ विमानांची वाहतूक; ३३ हजार प्रवाशांचा टप्पा पार

Timber Smuggling: गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; ६० लाखांचे अवैध सागवान जप्त

Latest Marathi News Live Update : राज्यात आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Krishna River Water Level : कोयना धरणातून 33 हजारांवर विसर्ग; कृष्णा नदीने ओलांडली 30 फुटांची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

NMC MBBS Admission: दिव्यांग विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार; एमबीबीएस प्रवेशासाठी एनएमसीची नवी मार्गदर्शक तत्त्वे दिव्यांगत्वच्या टक्केवारीऐवजी क्षमता आणि कार्यक्षमतेला महत्त्व

SCROLL FOR NEXT