in the german iornman competition 6 people from nashik won Ironman title
in the german iornman competition 6 people from nashik won Ironman title  Sakal
नाशिक

जर्मनीतील स्पर्धेत सहा नाशिककर ठरले ‘आयर्नमॅन’

अरुण मलाणी

नाशिक : खडतर, आव्‍हानात्‍मक स्‍पर्धांमध्ये आयर्नमॅन स्‍पर्धेचा आवर्जून समावेश होतो. सराव, जिद्दीच्‍या जोरावर आता नाशिककर दिमाखाने आयर्नमॅन स्‍पर्धेचा किताब पटकावू लागले आहेत. जर्मनीतील हम्बर्ग येथे झालेल्‍या आयर्नमॅन स्‍पर्धेत आठ नाशिककरांनी सहभाग नोंदविला होता. त्‍यापैकी सहा जणांनी आयर्नमॅन किताब पटकावला. यात नीलेश झवर, डॉ. देविका पाटील, डॉ. वैभव पाटील, अनिकेत झवर, अरुण पालवे, डॉ. अरुण गचाले यांचा समावेश आहे.


नीलेश झवर यांनी ११ तास ५९.२१ मिनिटे वेळ नोंदवत स्‍पर्धा संपविली. तर डॉ. देविका पाटील यांनी १३ तास ३ मिनिटे वेळ नोंदवत किताब आपल्‍या नावे केला. नीता नारंग यांनी १३ तास २५.३० मिनीटे, डॉ. वैभव पाटील यांनी चौदा तास २६.३४ मिनीटे, अनिकेतन झवर यांनी चौदा तास ३५.५५ मिनिटे, अरुण पालवे यांनी १५ तास ४.३४ मिनिटे, डॉ. अरुण गचाले हे १५ तास ३७.३७ मिनिटे अशी वेळ नोंदवत आयर्नमॅनचे मानकरी ठरले. तर डॉ. सुभाष पवार यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी आयर्नमॅन या खडतर स्पर्धेत सहभागी होण्याचे साहस केले. पोहणे व सायकलिंग त्‍यांनी निर्धारित वेळेत पूर्ण केले. परंतु धावण्याची शर्यत वेळेत पूर्ण करता आली नाही. किताब मिळणार नसला, तरी त्‍यांनी ही स्‍पर्धा पूर्ण केली हे विशेष. यापूर्वी त्यांनी ‘टायगर मॅन’ हा किताब वेळेत पूर्ण केला आहे. तसेच, नीता नारंग यांनीही स्‍पर्धेत सहभाग नोंदविला.
या सर्व स्‍पर्धकांना नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे व संस्‍थेच्‍या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्‍छा दिल्‍या. नाशिक रनर्सचे अध्यक्ष नारायण वाघ व सर्व धावपटूंचे लक्ष या स्पर्धेकडे लागून होते. मध्यरात्रीपर्यंत सर्वांनी जागे राहून अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला. सर्व स्पर्धकांना माजी पोलिस आयुक्त आयर्नमॅन रवींद्रकुमार सिंगल यांचे मार्गदर्शन लाभले.


स्‍पर्धा अन्‌ स्‍पर्धेतील आव्‍हाने

शारीरिक व मानसिक कसोटी पाहणाऱ्या या स्‍पर्धेत पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग व नंतर ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन शर्यतीत भाग घ्यायचा असतो. या तिन्‍ही क्रीडा प्रकारांतून स्‍पर्धा पूर्ण करण्यासाठी कमाल १५ तास ५० मिनिटांचा वेळ दिला जातो. निर्धारित वेळेच्‍या आत स्‍पर्धा पूर्ण करणाऱ्या स्‍पर्धकांना आयर्नमॅन किताब दिला जातो. ही स्पर्धा पूर्ण करताना हवामानाच्या बदलांचा सामना करावा लागला. अंधारातच पोहणे अत्‍यंत कठीण होते. शिवाय थंडगार पाणी स्‍पर्धकांसाठी आव्‍हानात्‍मक राहिले. सायकलिंग करताना हवेचा सामना करावा लागला. तर धावताना पाऊस सुरू असल्‍याने या देखील आव्‍हानाला स्‍पर्धकांना तोंड द्यावे लागले.



नाशिक अन्‌ आयर्नमॅन स्‍पर्धेतील रंजक बाबी...
* डॉ. देविका पाटील ‘फास्टेस्ट इंडियन आयर्न लेडी’ ठरल्या.
* यापूर्वी रविजा सिंगल हिने आशिया खंडातील ‘यंगेस्ट आयर्नमॅन लेडी’चा पटकावलाय मान
* डॉ. अरुण गचाले यांनी दुसऱ्यांदा आयर्नमॅन किताब पटकावला
* डॉ. रवींद्र सिंगल यांनीही पटकावलाय आयर्नमॅनचा किताब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT