Attractive idols of Vitthal, Rukmini and Satyabhama decorated in the background of Ashadhi in Vitthal temple.  esakal
नाशिक

Ashadhi Ekadashi 2023 : येथे आहे विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांचे एकाच देव्हाऱ्यात मंदिर!

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Ekadashi 2023 : मोसम खोऱ्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील ऐतिहासिक मंदिरात आषाढ़ी एकादशीनिमित्त गुरुवारी (ता.२९) एकदिवसीय यात्रा, पालखी मिरवणूक,भजन,कीर्तन,भागवत सप्ताहची सांगता आदी कार्यक्रमांचा जागर होणार असल्याची माहिती नवयुवक मित्रमंडळाचे संस्थापक सुनील अलई यांनी दिली. (In this village there is temple of Vitthal Rukmini and Satyabhama in same temple nashik news)

येथील ऐतिहासिक झेंडा चौकात सुमारे १४८ वर्षांपूर्वीचे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण अलई यांच्या मालकीचे प्राचीन विठ्ठल मंदिर आहे.

पंचक्रोशीतील ज्या भाविकांना आषाढी निमित्त पंढरपूरला जाणे शक्य होत नाही, असे हजारो भाविक येथील मंदिरात नतमस्तक होतात.

विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा (राई ) ही तिन्ही दैवते एकाच देव्हाऱ्यात असणारे हे एकमेव १९३० पासून भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर भागवत सप्ताहाची येथे सुरवात झाली. दरवर्षी आषाढी पंचमीला भागवत पारायण कथेचे वाचन केले जाते. पिंपळनेर (जि.धुळे) येथील भागवताचार्य मकरंद वैद्य गेल्या अनेक वर्षापासून पारायण कथेचे वाचन करतात.

आषाढीला पहाटे पाच वाजता मंदिराचे मूळ मालक आश्विन अलई यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची विधीवत पूजा करण्यात येईल. दुपारी दोन वाजता पारंपरिक मार्गाने विठ्ठलाची पालखी मिरवणूक निघेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पूर्वापार प्रथेनुसार आजही पालखी उचलण्याचा मान शहरातील भोई समाज बांधवांकडेच आहे. नृत्य सादर करणारा घोडा, आदिवासी बांधवांचे टिपरी, कोकणी नृत्य हे पालखीचे खास आकर्षण राहील.

आषाढी निमित्त गुरुवारी रात्री नऊ वाजता प्रभाकर महाराज बारगळ, कोपरगावकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी सकाळी महाप्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. शहर व परिसरातील नागरिक, वारकरी यांनी पांढरा गणवेश परिधान करून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. यात्रेच्या यशस्वितेसाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उत्सव समिती पदाधिकारी, व भजनी मंडळीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

शिंगाडी शेवचे आकर्षण....

शिंगाडी शेव हे येथील यात्रेचे खास आकर्षण असते. राजगिरयाचे पीठ आणि साखरेचा पाक यांच्या मिश्रणापासून तयार झालेला शिंगाडी शेवचा प्रसाद पांडुरंगाला दिला जातो. यंदा साखर, राजगीरा पीठ, मजूरी आदींच्या दरात वाढ झाल्यामुळे शिंगाडी शेवचा दर २०० रुपये प्रतिकिलो असा राहील, अशी माहिती विक्रेते सागर कंकरेज, संजय कंकरेज, सुनील कंकरेज यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT