Nitin Gadkari  esakal
नाशिक

Nashik News : गडकरींच्या हस्ते रविवारी इगतपुरीत 1830 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रीय महामार्गाच्या २२६ किलोमीटर लांबीच्या १ हजार ८३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा लोकार्पण आणि कोनशिला अनावरण कार्यक्रम रविवारी (ता. १८) दुपारी साडेतीनला इगतपुरी येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. हा कार्यक्रम महामार्गावरील महिंद्राशेजारील गार्डन व्ह्यूमध्ये होत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ही माहिती दिली. (Inauguration of 1830 crore projects in Igatpuri by Gadkari on Sunday Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

जिल्ह्यातील कामे आणि त्यांची लांबी पुढीलप्रमाणे असून (कंसात कामांची रक्कम रुपयांमध्ये दर्शवते) : गोंदे ते प्रिंपीसदो फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन-२० किलोमीटर (८६६ कोटी), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी- ३७ किलोमीटर लांबीच्या सटाणा ते मंगरूळचे रूंदीकरण व दर्जोन्नतीकरण (४३९ कोटी), दहावा मैल जऊळके-दिंडोरी व आंबेबहुला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन-४.३ किलोमीटर भुयारी व उड्डाणपूल (२११ कोटी), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० अ खंबाळे ते पहिने व शतगाव ते अंबोली- ३० किलोमीटर कामाचे मजबुतीकरण (३८ कोटी), गुरेवाडी फाटा ते सिन्नर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० चे मजबुतीकरण-९ किलोमीटर (१४ कोटी),

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० अ मार्ग- ५३.५०० किलोमीटर रस्ता सुरक्षा सुधार कार्य (११ कोटी), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ पिंपळगाव-नाशिक-गोंदे- ५१ किलोमीटर लांबीच्या मार्गावर एलईडी पथदीप लावणे कोनशिला (साडेसात कोटी), नांदगाव ते मनमाड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ जे- २१ किलोमीटर लांबीचे रुंदीकरण व दर्जोन्नतीकरण (२५३ कोटी).

पालकमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, हेमंत गोडसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, छगन भुजबळ, ॲड्. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, सुहास कांदे, ॲड्. राहुल ढिकले, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, नितीन पवार, मौलाना मुफ्ती आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT