Theater at Panchvati. esakal
नाशिक

Devendra Fadnavis Nashik Daura : पंचवटीतील नाट्यगृहाचे आज उद्घाटन

पंचवटी नाट्यगृहाचे उद्घाटन शनिवारी (ता. १०) दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Devendra Fadnavis Nashik Daura : पंचवटी हिरावाडी परिसरातील महापालिकेच्या सहा एकरच्या जागेत सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक पद्धतीने बांधलेल्या नाट्यगृहाचे उद्घाटन शनिवारी (ता. १०) दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास पालकमंत्री दादा भुसे, पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे आदी उपस्थित राहणार आहेत. (Inauguration of panchavati theatre in today by devendra fadnavis nashik news)

चार वर्षांच्या कालावधीत नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सहा एकरच्या जागेत २९०० चौरस मीटरचे बांधकाम झाले असून, आवारात बांधकामाच्या पश्चिमेला वाहनतळाची प्रशस्त व्यवस्था आहे. नाट्यगृहात आवश्यक त्या सर्वच प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असून, दोन्ही बाजूला प्रसाधनागृहांची व्यवस्था आहे. दोन्ही मजल्यावर स्वतंत्र दोन तालीम हॉल बांधलेले

आहेत. भव्य रंगमंच, सुसज्ज असा मेकअप रूम आहे. प्रकाशयोजना, ध्वनिव्यवस्था, स्वयंचलित सरकते पडदे, बाल्कनीत १५० आणि खाली ५०० अशा ६५० आरामदायी खुच्र्यांची आसनव्यवस्था आहे. नाट्यगृहाचे कामकाज सुरू असताना या बांधकामाकडे लक्ष ठेवण्याचे काम माजी नगरसेविका प्रियांका माने व धनंजय माने केले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्णत्वास आले. नाट्यगृहाच्या उ‌द्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेविका प्रियांका माने, पूनम मोगरे, माजी नगरसेवक रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप व धनंजय माने यांनी केले आहे.

असे आहे नाट्यगृह

२९०० चौरस मीटर बांधकाम, संरक्षक भिंत, प्रशस्त पार्किंगमध्ये ३४७ चारचाकी, ३४५ दुचाकी, १७४ सायकली पार्क करण्यासाठी प्रशस्त व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी नाट्यगृहाच्या दोन्ही बाजूला प्रसाधनगृह, व्हीआयपी रूम, रंगीत तालीम करण्यासाठी दोन हॉल, अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा.

लेटेस्ट टेक्नॉलॉजीची साउंड सिस्टिम, अत्याधुनिक स्टेज लाइट, स्वयंचलित सरकते पडदे, मुख्य रंगमंच १५ मीटर बाय १० मीटर, तालीम हॉल साडेसात बाय साडेसात मीटर आहे. प्रेक्षकागृहात खाली ५०० आणि बाल्कनीत १५० अशी आरामदायी खुर्च्छा आहेत. संपूर्ण इमारतीला अग्निशमन यंत्रणा बसविलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT