black magic incident.jpg 
नाशिक

'कोरोनाला घाबरा, करणीला नाही!'...अन् करणी केलेलं 'त्या' साहित्यातील लिंबू 'त्यांनी' तिथंच खाऊन दाखवला

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) शहराजवळील दाभाडी शिवारातील रोकडोबा वस्तीवर एका घरासमोर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी (ता.27) मध्यरात्री करणी करण्यासाठीचे साहित्य ठेवल्याने भिती निर्माण झाली. वैज्ञानिक दृष्टीकोन समितीचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी जाऊन करणीचे साहित्य जमा करत तेथील लिंबू खावून दाखविले. त्याचवेळी करणीची नव्हे कोरोनाची भिती बाळगा, घरात रहा, गर्दी टाळा असे आवाहन केले.

असा आहे प्रकार

कोरोनाची दहशत असतांना रोकडोबा वस्तीवर अंधश्रद्धेमुळे दहशत निर्माण झाली. येथील प्रविण माळी यांच्या दारात चुका ठोकलेले लिंबु, काळी बाहुली, मडके, शेणाने बनवलेली बाहुलीला चुका ठोकलेल्या होत्या. लाल फडके व मडके असे साहित्य हळद कुंकू लावून दाराच्या पायरीवर ठेवलेले होते. त्यामुळे वस्तीतील रहिवाशी घाबरले. श्री. निकम व शिंदे हे घटनास्थळी गेले. शिंदे यांनी सर्व करणीचे साहित्य जमा केले. त्यात असलेले लिंबु तेथेच खाल्ले व कोरोनाला घाबरा, करणीला नको असे आवाहन केले. वस्तीवरील करणीचे साहित्य नेल्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. गेल्या आठवड्यात अंधश्रध्दात्मक अफवेमुळे सोयगाव नववसाहत, दाभाडी भागातील व ग्रामीण भागात घरासमोर महिलांनी दिवे लावले होते.  

पंचायत समिती सदस्या कमळाबाई मोरे यांचे पती वसंत मोरे व दाभाडी येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे हरी निकम यांना माहिती दिली. त्यांनी छावणी पोलीसांशी संपर्क साधून वस्तीवरील परिस्थितीची जाणीव करुन दिली. श्री. निकम यांनी समितीचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांना संपर्क करुन परिस्थिती सांगितली. श्री. शिंदे यांनी कोरोनामुळे गर्दी होणार नाही याची दक्षता घेत येण्याचे सांगितले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT