Accident News Esakal
नाशिक

Accident News: विहीर खोदताना दुर्दैवी घटना! स्फोटकांचा स्फोट होऊन 3 जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर

अंकिता खाणे (Ankita Khane)

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीचे खोदकाम करताना बार उडवण्यात आला. यावेळी तिनही कामगार विहिरीत असल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावात ही घटना घडली आहे. या गावात ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोदकाम सुरू असून या ठिकाणी काही परप्रांतीय कामगार काम करत आहेत. अशातच काल रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

विहिरीत काम करत असताना बार लावण्यात आला होता. मात्र याचवेळी कामगार देखील काम करत होते. अचानक बार उडाला. यामध्ये तीन कामगार विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून त्यानंतर लागलीच रोहिले प्राथमिक उपचार केंद्रातून रुग्णवाहिका बोलावण्यात आली. जखमींना नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर सद्यस्थितीत नाशिक ग्रामीण पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल असून प्राथमिक तपास सुरू आहे.

स्फोटकांचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडली. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT