Nishikant Pagare, Raju Desale etc. expressing their happiness after Godavari's inclusion in Amrit Jal scheme. esakal
नाशिक

Nashik News : गोदावरीचा अमृतजल योजनेमध्ये समावेशाने पर्यावरणप्रेमींकडून आनंद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या नदी यात्रेत नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या गोदावरीचा समावेश राज्य शासनाने केला आहे. याचा पर्यावरणप्रेमींसह गोदावरी नदी संवर्धन समितीने आनंद व्यक्त केला असून, गुरुवारी (ता. १) सायंकाळी रामतीर्थ परिसरात पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. गोदावरीच्या समावेशासाठी समितीतर्फे अलीकडेच आत्मक्लेष आंदोलनही करण्यात आले होते. (inclusion of Godavari in Amrit Jal scheme is joy from environmentalists Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून ७५ नद्या व उपनद्यांचे जल अमृत व्हावे, यासाठी नद्यांच्या व उपनद्यांच्या शिवारफेरी तसेच यात्रा केली जाणार आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील नद्या प्रदूषणमुक्त, प्रवाही व अतिक्रमणमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नद्यांची यादी तयार करण्यात आला होता. मात्र पहिल्या यादीत गोदावरी नदीचे नाव नव्हते. गोदावरी नदी संवर्धन समितीकडून राज्य शासनाचे अभिनंदन करण्यासाठी सर्व नदीप्रेमी, पर्यावरणप्रेमी यांनी पवित्र अशा रामतीर्थावर स्थानिक नागरिक, भाविकांना पेढे देऊन आनंद व्यक्त केला. याप्रसंगी नदी संवर्धन समितीचे निशिकांत पगारे, राजू देसले, कपिला संवर्धन समितीचे योगेश बर्वे, नंदिनी नदी संवर्धन समितीचे प्रा. सोमनाथ मुठाळ, वरुणा नदी संवर्धन समितीचे रोहित कानडे, मनोहर अहिरे, अनिल आठवणे व स्थानिक महिला उपस्थित होत्या.

"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नदी यात्रेत पवित्र गोदावरीचा समावेश करण्यात आला, ही नाशिककरांसाठी आनंदाची बाब आहे. आता आम्हाला या यात्रेवर लक्ष ठेवता येणार आहे."

- निशिकांत पगारे, गोदावरी संवर्धन समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT