shimla mirchi success 1.jpg 
नाशिक

Success story : खाकुर्डीच्या तरुण शेतकऱ्याचा प्रयोग! वीस गुंठ्यात ढोबळ्या मिरचीतून पाच लाखांचे उत्पन्न; 

दीपक खैरनार

अंबासन (नाशिक) : काम कुठलेही असो त्याला प्रोत्साहन मिळाले की, आकाशही ठेंगणे होते. अशीच काहीशी प्रचीती आली ती खाकुर्डी येथील तरुण शेतकरी राहुल देवरे यांना. अवघ्या वीस गुंठ्ठ्यात ढोबळ्या मिरचीचे वाण लावून त्यांनी पाच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. अजून पुढील तीन ते चार महिन्यांतील मिरची विक्रीतून चार लाख मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

खाकुर्डी येथील तरुण शेतकऱ्याचा प्रयोग; पारंपरिक पिकांना फाटा 
खाकुर्डी (ता. मालेगाव) येथील शिवारात वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. शेतीत पारंपरिक पिके घेतली जात होती. त्यामुळे राहुल देवरे यांनी सुरवातीला दूध डेअरी सुरू केली. दुधाचे संकलन करूनही हाती दमडी लागत नव्हती. अखेर शेतीत नशीब अजमावत त्यांनी जोडधंदा म्हणून ट्रॅक्टर घेतला. त्यातून त्यांना भरीव रोजगाराचे साधन उभे राहिले. व्यवसाय व शेतातून त्यांनी एकूण सहा एकर शेती वाढविली. मात्र पारंपरिक पिकातून पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने ते हताश झाले. त्यांचे मित्र नीलेश शेवाळे यांनी राहुल यांना पारंपरिक पिकांना फाटा देत प्रायोगिक शेतातून भरघोस उत्पन्न मिळू शकते, असा सल्ला दिला. राहुल यांना प्रोत्साहन मिळाले. त्यांनी वीस गुंठ्यात शेडनेट उभा करून त्यात सुरवातीला रायपूर येथून पॅलेडिन जातीचे ढोबळी मिरचीचे रोप आणले.

वीस गुंठ्यात ढोबळ्या मिरचीतून पाच लाखांचे उत्पन्न

अतिशय उत्तम प्रकारे औषध फवारणी करून पहिलाच सातशे किलो ढोबळी मिरचीचा तोडा निघाला. राज्यात लॉकडाउन असतानाही त्यांना किलोला चाळीस रुपये भाव मिळाला. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. मात्र कोरोनामुळे मजूर टंचाई निर्माण झाली. श्री. देवरे यांना घरातील सदस्यांची मोठी मदत मिळाली. दर सहा दिवसांत एक ते सव्वा टन मिरचीचा तोडा होत आहे. पुढील काळात मिरचीपासून चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे देवरे यांनी सांगितले. 


अनेक वर्षांपासून राहुल देवरे यांना शेतातून अपेक्षित अशी पिके येत नव्हती. त्यांना पारंपरिक शेतीपेक्षा शेडनेट उभे करून त्यात ढोबळ्या मिरचीचे वाण लागवड करण्याचा सल्ला दिला, त्यात ते यशस्वी झाले. - नीलेश शेवाळे, राहुलचा मित्र, कजवाडे, मालेगाव  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT