MSRTC latest marathi news
MSRTC latest marathi news esakal
नाशिक

Shravan 2022 : तिसऱ्या सोमवारी MSRTCला साडेअठ्ठावन लाखांची लॉटरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : श्रावण महिन्‍याच्‍या तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्‍वरला दर्शन व ब्रह्मगिरी प्रदक्षिणा फेरीसाठी येणाऱ्या भाविकांच्‍या सुविधेसाठी जादा बसगाड्या उपलब्‍ध करून दिल्‍या होत्‍या. महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाने २३० जादा बसगाड्या उपलब्‍ध केल्‍या होत्‍या. या दरम्‍यान भाविकांच्या वाहतुकीतून महामंडळाला ५८ लाख ५१ हजार २२३ रुपये महसूल मिळाला आहे. (income of 58 half lakhs to MSRTC on third Monday Shravan 2022 Nashik Latest marathi news)

तिसऱ्या श्रावण सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला भाविकांची मोठी गर्दी होत असते. याशिवाय सोमवारी दिवसभर त्र्यंबकराजाच्‍या दर्शनासाठी भाविकांची रीघ बघायला मिळाली होती. वाहनांची वर्दळ लक्षात घेता, प्रशासकीय यंत्रणेतर्फे त्र्यंबकेश्‍वरच्‍या अलीकडेच खासगी वाहनांना वाहतुकीस बंदी करण्यात आलेली होती.

जुने सीबीएस बसस्‍थानकाहून एसटी बसगाड्या सोडण्यात येत होत्‍या. त्‍याप्रमाणे खासगी वाहनांना प्रवेश बंदी केलेल्‍या ठिकाणी भाविकांच्‍या सुविधेसाठी बसगाड्या उपलब्‍ध करून दिलेल्‍या होत्‍या.

या बसमधून भाविकांना एसटीने प्रवास करावा लागला. यंदाच्‍या वर्षी तिसऱ्या श्रावण सोमवारी एसटी महामंडळातर्फे १ लाख ६२ हजार १२१ भाविकांची वाहतूक करण्यात आली. २३० जादा बसगाड्या उपलब्‍ध करून दिल्‍या होत्‍या. चार हजार १८० फेऱ्यातून भाविकांची वाहतूक करण्यात आली. यातून एसटी महामंडळाला ५८ लाख ५१ हजार २२३ रुपये इतके उत्‍पन्न मिळालेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT