नाशिक : पिंपळगांवला सहा कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे sakal
नाशिक

नाशिक : पिंपळगाव बसवंतला आयकर विभागाचे 6 कांदा व्यापाऱ्यांवर छापे

पिंपळगांव शहरात एकच खळबळ उडाली

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव-बसवंत (जि.नाशिक) : पिंपळगांव शहरातील सहा कांदा व्यापाऱ्यांवर आज (ता.२१) आयकर विभागाने छापे टाकले. सकाळी सात वाजताच व्यापाऱ्यांच्या विविध आस्थापना कार्यालय, निवासस्थानावर आयकर विभागाने धाड टाकली. पिंपळगांव शहरात एकच खळबळ उडाली असुन इतर व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पिंपळगांव शहरात नामांकीत कांदा व्यापाऱ्यावर आयकर विभागाने संक्रांत आणली.

सकाळ पासुन गेल्या वर्षभरातील कांद्यासह जमीन खरेदीचे कागदपत्रे, बॅकेतील व्यवहार यांची कसुन चौकशी सुरू होती. पोलीस बंदोबस्तासह आयकर विभागाच्या सहा पथकाची कारवाई दिवसभर सुरू होती. आयकर विभागाच्या छाप्यामुळे पिंपळगांव बाजार समितीत कांदा लिलावावर काहीसा परिणाम जाणवला. व्यापाऱ्यांनी या कारवाई धसका घेतला आहे. पिंपळगांव शहरातील नागरिकांमध्ये याबाबत चर्चा होती. पिंपळगांव बाजार समिती लगत असलेल्या चिचंखेडच्या भुखंडाची खरेदीचे कनेक्शन मुळे व्यापाऱ्यांवर हे धाडसत्र झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT