Nasal vaccination esakal
नाशिक

Nashik News : नवीन वर्षात मिळणार Incovacc लस; नाकावाटे लशीला शासनाची मंजुरी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्ससह पाश्‍चात्य देशात कोरोनाचा उद्रेक होत असताना भारत देशाने कोरोनाचा मुकाबला करण्याची तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर बायोटेकच्या नाकावाटे कोरोना प्रतिबंध लसीची ( 'इनकोव्हॅक' लस) किंमत शासनाने जाहीर केली आहे.

ही लस केवळ शासकीय रुग्णालयांतून द्यावी की खासगी रुग्णालयांना 'इनकोव्हॅक' लस देण्यासाठी परवानगी देण्यात यावी, यावर शासन स्तरावरवर संभ्रम आहे. मात्र, 'इनकोव्हॅक' लस पुढील पंधरा दिवसात नाशिकमध्ये उपलब्ध होणार असल्याचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यानुसार नवीन वर्षात नाशिककरांना 'इनकोव्हॅक' लस देण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. (Incovacc vaccine will available in new year nosal vaccine approved by government Nashik News)

चीनप्रमाणेच जगातील अन्य देशातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारने गर्दीच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे लसीकरण वाढविण्याबाबत गत आठवड्यात सूचित केले आहे. केंद्रापाठोपाठ आता राज्याच्या आरोग्य विभागाने नाशिक जिल्हा आरोग्य विभागाला कोरोनाच्या उपाययोजनांची अंमलबाजणी करण्याबाबत सूचना केल्यानंतर, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दक्ष झाला आहे

. लसीकरण वाढविणे, केंद्रावरील तपासण्या वाढविणे, विलगीकरण कक्ष तयार करणे आदी उपाययोजनांची अंमलबाजणीस सुरवात झाल्याचे जिल्हा आरोग्य डॉ. हर्षल नेहते यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालय येथे लसीकरण वाढविण्य़ाबाबत तसेच तिसरा डोस घेण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने, हे लसीकरण वाढविण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत.

जिल्हयात कोव्हॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध आहे. मात्र, कोविशिल्ड लसीचा साठा पुरेसा नसला तरी, पुढील १५ ते २० दिवसांत ही लसही शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

दर ३२५ ते ८०० रूपये

नाकावाटे कोरोना प्रतिबंधक लशीला देखील मान्यता मिळाली आहे. त्यांची किंमत देखील जाहीर झाली आहे. खासगी रुग्णालयासाठी ८०० रुपये तर, शासकीय रूग्णालयात ही लस ३२५ रुपयात उपलब्ध होणार आहे.

ही लस जानेवारी महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे ही लस सर्व प्रथम खासगी रूग्णालयात उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या व्यक्तीने दोन्ही लस घेतले आहे, त्याच व्यक्तींना ही लस देण्याचे नियोजन आहे. साधारण राज्यात लस प्राप्त झाल्यानंतर नाशिकमध्ये ही लस उपलब्ध होऊ शकते असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT