dengue and chikungunya esakal
नाशिक

सावधान! नाशिक शहरात डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांमध्ये वाढ

तुषार महाले

नाशिक : पावसाळा सुरु झाला असल्यामुळे साथीच्या आजारात वाढ होते. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांसारखे साथीचे आजार पसरायला लागले की काळजी वाटते. मात्र कोरोनाकाळात (Coronavirus) नागरिकांनी मास्कचा वापर वाढल्यामुळे साथीच्या इतर आजारांमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूने नागरिकांमध्ये जागृतता निर्माण झाली असून स्वच्छतेचे प्रमाणही वाढले असल्याचे चित्र आहे. (increase-in-dengue-and-chikungunya-patients-nashik-health-news)

कोरोना जनजागृतीमुळे इतर साथीच्या आजारांमध्ये घट

शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली नसली तरी डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नाशिक शहरात मागच्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत या जूनमध्ये साथीच्या आजाराचे प्रमाण कमी होते. कोरोनामुळे नागरिकांमध्ये जनजागृती वाढली आहे. तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेक उपाय केले जात आहे. योगा, ध्यान करण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांना घरून काम करता आल्याने मानसिक ताण कमी झाल्याचे दिसत आहे.

पावसाळा अनेक आजारांना घेऊन येत असल्याने अडचणींमध्ये मोठी वाढ होते. बऱ्याच भागात पाणी साचलल्याने त्या ठिकाणी डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजाराचा प्रादूर्भाव वाढला आहे. पावसाळी वातावरणात ताप, सर्दी, डोकेदुखी आणि खोकल्यासह इतर आजारांची लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. कोरोनामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती वाढली असून बाहेरचे खाणे टाळले जात असल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी नागरिक विविध उपाय करताना दिसत आहे.

तेलकट अन्न टाळा

कोरोनामुळे बाहेरचे खाणे टाळले जात असले तरी घरच्या जेवनानेही अपचन होण्याची समस्या उद्भवत आहे. उच्च आर्द्रता असताना शरीराची पचनशक्ती कमकुवत होते. त्यामुळे बाहेर तसेच घरात शिजवलेले तेलकट अन्न पदार्थ खाणं टाळावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

''कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. रोजचे ५-६ रुग्ण रोज वाढत आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी, फ्लूसदृश आदी आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. मास्कच्या वापरासह बाहेरचे खाणे टाळले जात असल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. डायरियाचे रुग्णही कमी असून साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झाले आहे.'' - डॉ. अतुल अहिरराव, नाशिक

(increase-in-dengue-and-chikungunya-patients-nashik-health-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT