Increase in incidents of cyber scammers robbing electricity consumers nashik scam alert news
Increase in incidents of cyber scammers robbing electricity consumers nashik scam alert news esakal
नाशिक

Nashik Scam Alert : सायबर स्कॅमर कडून वीज ग्राहकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ

अजित देसाई

सिन्नर : अनोळखी क्रमांकावरून वीजबिल भरण्यासंदर्भातील येणाऱ्या फ़सव्या संदेशाला बळी पडू नये आणि वीज ग्राहकांना लुटणाऱ्या सायबर स्कॅमरपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

महावितरणने कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच अॅपवर फेक मेसेजद्वारे होणारी फसवणूक कशी रोखता येईल याबाबतची माहिती जनहितार्थ प्रसिद्ध केली आहे. (Increase in incidents of cyber scammers robbing electricity consumers nashik scam alert news)

तुमचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज अमूक वाजता तुमचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना रात्री अपरात्री पाठविण्यात येत आहेत. एखाद्या ग्राहकाने या मेसेजला प्रतिसाद दिल्यावर वीज बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जाते.

तसे केल्यावर तात्काळ तुमचा मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची दाट शक्यता आहे. अलीकडे अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा बनावट मेसेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांनाच सिस्टमद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येते.

तसेच अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइलवर संपर्क करण्याबाबत कळवत नाही. वीज बिलाबाबत काही शंका व तक्रारी असल्यास किंवा याबाबत काही एसएमएस आल्यास वीजग्राहकांनी 24 तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांक किया नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा. असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

सतर्क राहा आणि फ़सवणूक टाळा :

• महावितरण तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही

• महावितरण केवळ VM-MSEDCL/VK-MSEDCL/AM-MSEDCL/JM-MSEDCL सारख्या SENDER ID वरून एसएमएस पाठवते आणि कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून एसएमएस व व्हॉटस्अॅप मेसेज, इ-मेल पाठविण्यात येत नाहीत (SENDER ID मधील पहिली 2 अक्षरे ऑपरेटर आणि स्थान दर्शवितात जिथून संदेश पाठवला जात आहे आणि तो MSEDCL वर समाप्त होतो.)

• बिलाच्या पेमेंटसाठी लिक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करू नये.

• मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नये.

• अधिक माहिती / प्रश्नांसाठी, ग्राहक 1912/19120/1800-212-3435/1800-233 या अधिकृत टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकतात.

ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्याही परिस्थितीत तुमचा मोबाइल किंवा डेस्कटॉप स्क्रीन किंवा तुम्हाला मिळालेला OTP शेअर करू नका. फसवणूक झाली किंवा फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर ग्राहक जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार / एफआयआर नोंदवू शकतो किंवा राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल https://cybercrime.gov.in वर किंवा 1930 या क्रमांकावरील नागरिक आर्थिक फ़सवणूक पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतो.

''मार्च एंड च्या तोंडावर महावितरणच्या ग्राहकांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण वाढू शकते. सायबर स्कॅमर कडून आलेल्या कॉलला प्रतिसाद न देता आम्ही आमच्या विभागातील महावितरणचे कर्मचारी व अधिकारी यांच्याशी थेट संपर्क करतो असे सांगावे. त्याच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देऊन कॉल वर बोलत बसू नये.

महावितरणच्या कोणत्याच कार्यालयातून विज बिल भरण्यासाठी व वीजपुरवठा खंडित करण्यासाठी कॉल केला जात नाही. महावितरणचे फिल्ड वरील कर्मचारी स्वतः आपापल्या भागात वसुलीसाठी ग्राहकांच्या घरापर्यंत जातात. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांनी संभाव्य ऑनलाइन आर्थिक फसवणूकीपासून सावध राहावे.''-विकास आढे (जनसंपर्क अधिकारी, महावितरण नाशिक विभाग )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

SCROLL FOR NEXT