st bus  esakal
नाशिक

संपामुळे ST बसेसच्या मेटेनन्स खर्चात वाढ; महामंडळाला फटका

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तेव्हापासून लालपरीची चाके थांबली आहेत. त्यामुळे बस बाहेर निघालेल्या नसल्याने त्यांचा मेटनन्सचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. बहुतांश बसच्या बॅटऱ्या डाउन होऊन टायरमधील हवा जाऊन त्या टेकल्या आहेत.

बॅटऱ्या झाल्या डाउन तर टायरमधील हवा गायब

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, लालसगाव आगाराच्या सुमारे शंभर बस ग्रामीण भागासह परजिल्ह्यात प्रवास करण्याचा महत्त्वाचा दुवा आहे. सुरक्षित प्रवासामुळे अनेक नागरिक बसलाच प्राधान्य देतात. पण दीर्घकाळ सुरू असलेल्या संपामुळे अवघ्या १० ते १२ बस सुरू आहेत. पाच महिन्यांपासून बस एकाच ठिकाणी उभी असल्याने मेटनन्सच्या अडचणी वाढल्या आहेत. शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, या एकाच मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. तेव्हापासून लालपरी एकाच जागेवर उभी आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्याने बसगाड्या त्या-त्या आगरातच उभ्या आहेत. संपामुळे एसटी महामंडळाचे आतापर्यत कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. गर्दीच्या हंगामात कर्मचारी संपावर असल्याने महामंडळाला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. सणासुदीला कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांना अनेक अडचणी आल्या. दरम्यानच्या काळात काही बसचालक व वाहक कामावर रुजू झाले. त्यामुळे काही प्रमाणात बस वाहतूक सुरू झाली.

कामावर हजर होण्याबाबत मौन...

एसटी कर्मचारी पाच महिन्यांपासून संपावर आहेत. ते त्यांच्या मागण्यावर ठाम असल्याने अद्याप संप सुरूच आहे. उच्च न्यायालयाने सकारात्मक आदेश दिल्यानंतर पिंपळगावच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. मात्र, कामावर नेमके कधी हजर होणार, याबाबत त्यांनी मौन पाळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT