Marriage sakal
नाशिक

कोरोना प्रादुर्भाव कमी होताच विवाह नोंदणीत वाढ

कोरोना (Corona) प्रादुर्भाव कमी होताच विवाह नोंदणीत वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : कोरोना (Corona) प्रादुर्भाव कमी होताच विवाह नोंदणीत वाढ झाली आहे. महापालिका पूर्व विभागीय कार्यालयाचा विचार केला, तर २०२१ मध्ये वर्षभरात २५७, २०२२ मध्ये केवळ पाच महिन्यात सुमारे १५० विवाह नोंदणी झाली आहे.


कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात सामाजिक सोहळे, धार्मिक कार्यक्रम, विवाह सोहळे अशा विविध कार्यक्रमांवर बहुतांशी प्रमाणात बंदी होती. २०२१ मध्ये कोरोना प्रादुर्भाव काहीसा कमी झाला. गर्दी न करता १०० ते १५० जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्याना परवानगी देण्यात आली. परंतु भीतीपोटी हवे तसे विवाह सोहळे होऊ शकले नाही. त्यामुळे विवाह नोंदणीदेखील झाली नाही. २०२१ जानेवारी ते डिसेंबर संपूर्ण वर्षभरात केवळ २५७ विवाह नोंद विभागीय कार्यालयात करण्यात आली. त्या तुलनेत २०२२ मध्ये विवाह सोहळ्याचा धूमधडाका जोरात होता. जानेवारी ते मे, या पाच महिन्यात तब्बल १५० विवाह नोंदणी झाले. वर्षपूर्तीत अजूनही ७ महिने अवकाश आहे. येणाऱ्या महिन्यांमधील होणाऱ्या विवाह नोंदणीचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दुप्पट विवाह नोंदणी होण्याची शक्यता विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. गेल्यावर्षी कमी-अधिक प्रमाणात कोरोना प्रादुर्भाव असल्याने पहिले तीन महिने जानेवारी ते मार्च विवाह नोंदणी होण्याचे प्रमाण अधिक होते.

मे महिन्यात तफावत

विवाह नोंदणी संदर्भात दोन्ही वर्षाच्या मे महिन्यातील तफावतचा आकडा लक्षात घेतला तर जमीन आसमानचा फरक दिसून येत आहे. २०२१ मधील मे महिन्यात कोरोना पुन्हा डोके वर काढल्याने केवळ २ विवाह नोंदणी शकल्या. २०२२ च्या मे महिन्यात विवाह नोंदणीने उंच भरारी घेतली. २७ मेपर्यंत तब्बल २७ विवाह नोंदणी झाल्या आहे.

दीड वर्षातील विवाह नोंदणी

२०२१ - २०२२

महिना - विवाह नोंदणी- महिना- विवाह नोंदणी
जानेवारी - ३० जानेवारी - २७
फेब्रुवारी- ३७ फेब्रुवारी - ४२
मार्च -३१ मार्च - २६
एप्रिल- १४ एप्रिल - २७
मे- ०२ मे- २७
जून- २२
जुलै- २४
ऑगस्ट- १७
सप्टेंबर- २७
ऑक्टोंबर- २१
नोव्हेंबर - १४
डिसेंबर - १८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT