Back Pain news esakal
नाशिक

खड्ड्यांमधून मार्ग काढण्याच्या कसरतीत; मान-पाठ-कंबरेच्या समस्यांत वाढ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : या वर्षी झालेला जोरदार पाऊस आणि रस्त्यांची झालेली चाळण यामुळे नागरिकांना खड्ड्यांमधून प्रवास करणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. मागील दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमध्ये बहुतांश जणांचे ‘वर्क फ्रॉम होम’ असल्याने खड्ड्यांमधून प्रवास करण्याची गरज तुलनेने कमी होती. परंतु यंदा सर्व दैनंदिन कामे सुरू असल्याने खड्ड्यांमधून प्रवास करणे अनिवार्य झाले आहे.

रोजच्या प्रवासामध्ये खड्ड्यांमुळे उद्‍भवणाऱ्या पाठ, कंबर आणि मानेच्या विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. हे आजार उद्‍भवू नयेत यासाठी थोडी काळजी घेणेही पुरेसे असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (Increase in neck back waist problems due to Potholes nashik Latest Marathi News)

मागील महिनाभरात खड्ड्यांमधून वाचण्यासाठीचे प्रयत्न करताना बाईकवरून पडल्याने अनेक अपघात झाले आहेत. शहरात अपघातामध्ये एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे खड्ड्यांमधून होणारा हा जीवघेणा प्रवास सुखकर कसा करता येईल, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

खड्ड्यांमधून प्रवास करताना विशेषत: पाठीचे आणि कंबरेचे आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. प्रवास करताना सीटबेल्टचा वापर करणे फायदेशीर ठरेल. एक खड्डा चुकविण्याच्या नादात दुसऱ्या खड्ड्यात गाडी जाते आणि जोरदाक झटका बसल्याने पाठ, मान आणि कंबरेवर त्याचा विपरित परिणाम होतो.

त्यामुळे ‘स्लीप डिस्क’चा त्रास उद्‍भवू शकतो. वास्तविकता खड्ड्यांमुळे प्रवास करणे तर टाळता येऊ शकत नाही; पण खबरदारी मात्र घेऊ शकतो. त्याशिवाय जर तुम्ही पाठीचा रोज व्यायाम करत असाल तर तुमचे स्नायू बळकट होतात. त्यामुळे या खड्ड्यांच्या झटक्यांमुळे होणाऱ्या वेदना काहीशा कमी होऊ शकतात.

वोक्हार्ट हॉस्पिटलचे सांधेविकार शल्यचिकित्सक डॉ. पंकज गुंजाळ सांगतात, की जेवढ्या वेगात एखादा चालक खड्ड्यातून जातो तेवढ्या जोरात हिसका बसतो. दुचाकीस्वारांमध्ये मानेच्या व कमरेच्या समस्या तीन ते चारपटीने अधिक प्रमाणात दिसून येतात.

अशा समस्यांवर सुरवातीला व्यायाम आणि फिजिओथेरपी असेच उपचार केले जातात. तरीदेखील बरे न वाटल्यास एमआरआय किंवा एक्सरे काढून पुढील उपचार ठरविले जातात. तसेच इंजेक्शन देऊनही ही समस्या तात्पुरती बरी करता येऊ शकते.

दुचाकीस्वरांनी हे लक्षात ठेवा

खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी तर खूपच काळजी घेण्याची गरज आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे. दुचाकीचा बॅक बाईक रेस्ट असल्यास उत्तम राहील आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दुचाकीचा वेग नियंत्रणात असावा.

ज्यांना रोज प्रवास करावा लागत असेल त्यांनी दररोज १५-२० मिनिटे मान आणि पाठीचे व्यायाम करणे आवश्यक आहे. धूम्रपान करणाऱ्यांना पाठ, मान आणि कंबरदुखीसारख्या समस्यांचा अधिक त्रास होतो. कारण त्यांची हाडे अधिक कमकुवत झालेली असतात. त्यामुळे धूम्रपानसारख्या वाईट सवयींपासून दूर राहणे योग्य राहील. हाडे मजबुतीसाठी संतुलित आहार घेणेही गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT