crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : ओझर परिसरात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ; पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ

ओझर व परिसरात काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या वीजपंपावर लक्ष केंद्रित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : ओझर व परिसरात काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या वीजपंपावर लक्ष केंद्रित केले आहे. याबाबत शेतकरी ओझर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास गेले असता, फिर्याद घेण्याऐवजी साध्या कागदावर अर्ज करण्यास सांगण्यात आले.

पोलिसांच्या अजब कारभारामुळे चोरट्यांचे मात्र चांगलेच फावत आहे. (Increase in petty theft in Ozar area nashik crime news)

काही दिवसांपासून ओझर व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मुद्देमालाची किंमत कमी असल्याने नसती झंझट नको, म्हणून नागरिक पोलिसांत फिर्याद देत नाही. याचाच फायदा उचलत आता चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या वीजपंपावर लक्ष केंद्रित केले आहे. सोनेवाडी, शेजवळवाडी व महादेवमठ परिसरांतील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून काही दिवसांपासून वीजपंप चोरट्यांनी चोरून नेले.

याबाबत काही शेतकऱ्यांनी तोंडी, तर काहींनी लेखी तक्रार केली. यातील एकही चोरी अद्याप उघडकीस आलेली नाही. यावर कळस म्हणजे नुकत्याच एका शेतकऱ्याच्या शेतातून चोरट्यांनी वीजपंप चोरून नेला. याबाबत शेतकरी चोरीची फिर्याद द्यायला गेला असता, त्याला चक्क साध्या कागदावर अर्ज करण्यास सांगण्यात आले.

तक्रारदार तक्रार देण्यास गेला असता, ओझर पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप या तक्रारदाराने केला आहे. पोलिस ठाण्यात गेल्यावर पोलिस फिर्यादीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करतात. त्यामुळे फिर्यादीची अवस्था ‘भीक नको पण...’, अशी होत आहे.

यामुळे छोट्या चोऱ्यांबाबत तक्रारदार पुढे येत नाही. साध्या कागदावर अर्ज केल्याने त्याची ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने साहजिकच गुन्ह्यांचे प्रमाणही कमी दिसते त्यासाठीच पोलिसांनी हि शक्कल लढविल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT