funds esakal
नाशिक

NSS Volunteer Subsidy : ‘एनएसएस’ स्‍वयंसेवकांच्‍या अनुदानात वाढ; शिबिर अनुदानही वाढविले

सकाळ वृत्तसेवा

NSS Volunteer Subsidy : शासन निर्णयानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस)‍ स्‍वयंसेवकांना दिल्‍या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. नुकत्याच झालेल्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

त्‍यानुसार हे अनुदान २५० वरून ४०० रुपये प्रतिविद्यार्थी केले आहे. विशेष शिबिर अनुदान ४५० वरून ७०० प्रति विद्यार्थी करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. (Increase in subsidy for NSS volunteers nashik news)

या निर्णयाचा लाभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एनएसएस’च्या १६ हजार ५०० विद्यार्थ्यांना आणि शिबिरात सहभागी होणाऱ्या आठ हजार २५० विद्यार्थ्यांना होणार आहे. बैठकीत ‘एनएसएस’च्या कामकाज आणि अनुदानासंदर्भात सखोल चर्चा झाली.

सेल्फी विथ माती विश्वविक्रमात भरीव योगदान दिल्याबद्दल एनएसएस आणि विद्यार्थी विकासार्थ विभागांच्या अभिनंदनाचा ठराव व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी मांडला.

त्याला बागेश्री मंठाळकर यांनी अनुमोदन दिले. तसेच, गेल्या वर्षीच्या थकीत अनुदानामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यित महाविद्यालये आणि समन्वयक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना त्वरित मागील अनुदान मिळण्यासाठी आग्रह या वेळी धरण्यात आला.

सुमारे पाच कोटींचे थकीत अनुदान केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून त्वरित द्यावे, अशी मागणी श्री. वैद्य यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT