Indian Spices esakal
नाशिक

Spices Rate Hike : मसाल्याच्या पदार्थांच्या दरात वाढ! भाव वाढीमुळे गृहिणी त्रस्त

गोविंद अहिरे

नरकोळ (जि. नाशिक) : थंडीचा जोर कमी होताच अन्‌ उन्हाळा सुरु झाल्याची चाहूल लागल्याने महिलांकडून मसाला पदार्थ बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. वर्षभर पुरेल इतकी साठवण महिला दरवर्षी करून ठेवतात.

यावर्षी मसाल्याच्या पदार्थांचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले असून जिरे बडीशेप यासारख्या पदार्थाचीही वाढ दिसून येत आहे. मिरचीचे दरातही वाढ असल्याने सर्व सामान्य गृहिणींचे स्वयंपाकघरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. (Increase in the price of spices Housewives suffer due to price hike nashik news)

दोन किलो पासून पुढे मिरचीसाठी पॅकिंग केलेला मसालाही आता उपलब्ध आहे. दोन किलो मिरचीसाठी ९०० रूपये पॅकिंगसह आकारले जात आहे. सर्व वस्तूंसह राज्यात बहुतांश मसाल्याचे पदार्थ हे केरळमधून येत असतात.

येथील अति पाऊस व हवामानाचा परिणाम उत्पन्नावर झाला असल्यामुळे मसाल्याच्या पदार्थांचे दर वाढले आहे. रोजच्या आहारात मसाल्याला अन्य साधारण महत्त्व आहे. सर्वच पदार्थांच्या भाववाढीमुळे मसाल्याची फोडणी महागली आहे.

असे आहेत मसाल्याच्या पदार्थांचे दर (प्रतिकिलो)

प्रकार यावर्षाचे दर मागील वर्षाचे दर

हळद १८० १४० रुपये

जिरे ४०० ३००

धने १८० १२०

बडीसोप २२० १६०

लवंग ८०० ७००

मिरे ७ ०० ६००

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मिरचीचे दर प्रतिकिलोमध्ये

मिरची प्रकार- यावर्षी गेल्या वर्षी (दर)

तेजा २०० १६०

गणतूर (सी,५) २४० २००

बेगडी ६०० ४००

"वर्षभर पुरेल यानुसार मसाला बनविण्यात येतो. परंतू ही सकाळ संध्याकाळ लागणारा पदार्थ आहे. यासाठी महागाई असली मसाला करावाच लागतो."- बेबीबाई देवरे, गृहिणी, वीरगाव

"महाराष्ट्रात बहुतांश मसाल्याचे पदार्थ हे केरळ तर मिरची आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, धुळे, नंदुरबार या भागातून येते. गेल्यावर्षी पाऊस जास्त व वातावरणातील बदल यामुळे मसाले पदार्थसह मिरचीचे नुकसान झाल्याने भाव वाढले आहेत."

- चेतन अमृतकार, संचालक दत्त प्रोव्हिजन, सटाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई-पुणे महामार्गावरील बोर घाटात अवजड वाहनांना बंदी

Kavthe Yamai Crime : ऊसाच्या शेतात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ; पोलिसांना खुनाचा संशय

SCROLL FOR NEXT