corona or fever 1.jpg 
नाशिक

नाशिकमध्ये पारा घसरल्याने कोरोना लक्षणांच्या रुग्णांमध्ये वाढ 

महेंद्र महाजन

नाशिक : नाशिकचा पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने शहर आणि जिल्हावासीयांना हुडहुडी भरली आहे. मंगळवारी (ता. ८) किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. थंड हवामानामुळे सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वाढ झाल्याने कोरोनाची लक्षणे आढळू लागली आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने निफाड, सिन्नर, नाशिक, इगतपुरी, बागलाण, नांदगाव, दिंडोरी तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये यंत्रणेला रोज चार हजार चाचण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या ११० आहे. त्यांच्या माध्यमातून अॅन्टिजेन आणि स्वॅब चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. त्यातून कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभागाने कोरोनाची दुसरी लाट २० डिसेंबर ते २६ जानेवारीला या कालावधीत येण्याची शक्यता वर्तविली असल्याने त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने उपाययोजनांवर भर दिला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्य संस्थांमध्ये पुरेशी साधनसामग्री उपलब्ध असावी म्हणून जारी करण्यात आलेल्या निविदा उघडण्यात आल्या आहेत. दोन दिवसांमध्ये होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब होताच, पुढील आठवड्यात आरोग्य संस्थांमध्ये साधनसामग्री पोच होईल, अशी तयारी करण्यात आली आहे. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले

५ टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ 
गारठ्याने सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत ५ टक्क्यांनी भर पडली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. नेमके किती रुग्णांवर दररोज उपचार केले जात आहेत, याची माहिती आरोग्य विभागातर्फे संकलित केली जाणार आहे. दरम्यान, सद्यःस्थितीत गारठ्यामध्ये काम असल्याखेरीज घराबाहेर पडू नये. उबदार कपडे परिधान करावेत. गरम पाणी पिण्यासोबत गरम भोजन करावे. प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचा आहारामध्ये वापर वाढवावा, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. आरोग्य यंत्रणेच्या अंदाजानुसार रुग्णांच्या संख्येत पुढील आठवड्यापासून वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाने ६९९ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत एक हजार १७१ रुग्ण उपचार घेताहेत. त्यामध्ये निफाड, सिन्नर, नाशिक, बागलाण या तालुक्यातील रुग्णांची संख्या तीनअंकी आहे. येवला, सुरगाणा तालुक्यातील रुग्णसंख्या एक, तर उर्वरित तालुक्यांमध्ये दोनअंकी रुग्णसंख्या आहे. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​
त्र्यंबकेश्‍वर-पेठमध्ये एकही नाही रुग्ण 
निफाड- ३०२ देवळा- २३ 
सिन्नर- २८४ मालेगाव- १५ 
नाशिक- २०५ कळवण- १८ 
बागलाण- १३० इगतपुरी- १२ 
नांदगाव- ३५ त्र्यंबकेश्‍वर- ८ 
दिंडोरी- ७४ येवला- ११ 
चांदवड- ५९ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT