-fish.jpg 
नाशिक

खवय्यांनो.. मटण, माशांचे दर कडाडले..? जाणून घ्या कारण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ पिंपळगांव बसवंत : धार्मिक सणांमुळे अनेक जण हे मासांहार करणे वर्ज्य करत असतात. त्यामुळे हे धार्मिण सण, उत्सव सुरू होण्यापूर्वीच मांसाहार करणारे अनेक जण हे मटण, मासे, चिकन, बोंबील आदींवर मिळेल तसा ताव मारून मन तृप्त करून घेत असतो. आता अशीच परिस्थिती सुरू असून लवकरच ही परिस्थिती बदलली जाणार आहे.

खवय्यांकडून मांसाहारला अधिक पसंती

पुढील महिन्यापासून सुरू होत असलेला श्रावण महिना, गणेशोत्सव आदी धार्मिक सण, उत्सव सुरू होणार असल्याने खव्यांकडून मांसाहारला अधिक पसंती दिली जावू लागल्याने बाजारात मटण, माशांसह चिकणचे दर कडाडले आहे. पिंपळगांव बसवंत व ओझर शहरातील मटण, चिकन, मासे विक्रीच्या बाजारात गर्दी वाढत आहे. यामुळे मासांहारात 25 टक्‍क्‍यानी वाढ झाल्याचे विक्रेते सांगत आहे. कोरोनात अफवाच्या बाजारात मातीमोल भाव मिळालेल्या चिकनला देखील चांगला भाव आला आहे.

दरात कमालीची वाढ
पुढील महिन्यात श्रावण व त्यानंतर गणेशोत्सवाच्या आगमानाची चाहुल सुरू झाल्याने खव्यांकडून आता आठवड्यातून तीन ते चार दिवस मासांहारावर ताव मारला जात आहे. वाढत्या मागणीमुळे पिंपळगांव व ओझरच्या मासांहार विक्रीच्या बाजाराला सध्या जत्रेचे स्वरूप आले आहे. मागणी वाढल्याने मासांहाराच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. दर भडकले असले तरी खैवय्याचा उत्साह जराही कमी झालेला नाही. मटनाचे दर 600 ते 650 रूपये प्रतीकिलो पर्यत पोहचले असून चिकनचे दरही 200 ते 250 रूपये प्रतिकीलो पर्यत वधारले आहे.

श्रावण महिना सुरू होईपर्यंत ग्राहकांची गर्दी कायम
माशांच्या बाजारात तेजीची लाट आली आहे. पापलेट, सुरमई, हलवा, कोळंबी, वाम, बांगडा, मांदेली या प्रकारातील मासे विक्रीला असून त्यांचे दर प्रतिकिलो 200 ते 900 रूपये पर्यंत पोहचले आहे. मांसविक्रीच्या बाजाराला श्रावण महिना सुरू होई पर्यत ग्राहकांची गर्दी कायम राहणार आहे.दरम्यान, सोशल डिस्टसिंगच्या कारणामुळे पिंपळगाव शहरातील मटण व चिकन मार्केट बंद असल्याने विक्रेत्यांनी शहराच्या बाहेर व्यवसाय थाटला आहे. व्यवसायाकरीता हीच वेळ असल्याने मटण मार्केट सुरू करावे अशी मागणी विक्रेता संघटनेने ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे.

श्रावण महिना आणि त्यानंतर सुरू होत असलेले सण उत्सवांमुळे अचानक मासांहाराला मागणी वाढल्याने सर्वांचे दर वाढले आहेत. यातच बोकड व माशांचा पुरवठाही कमी होत आहे. - मनोज गांगुर्डे (मत्स्य विक्रेते.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : मागाठाणेतील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसेचा निषेध

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

New Year 2026 Skin Care: नववर्षात हवी ग्लोइंग स्किन? मग आत्ताच सुरू करा 'हा' 2 महिन्यांचा स्किनकेअर प्लॅन

SCROLL FOR NEXT