Water Supply Through Tankers esakal
नाशिक

Water Crisis: उन्हाची तीव्रता वाढल्याने जिल्ह्यात टॅंकरच्या मागणीत वाढ! लाखाहून अधिक जनता अवलंबून

सकाळ वृत्तसेवा

Water Crisis : शहर व जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत एक लाखाहून अधिक लोकसंख्येला टॅकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

साधारणतः सव्वाशेहून अधिक टँकर सुरू आहेत. (Increased demand for tankers in district due to increase in summer intensity More than lakhs of people depend nashik news)

जिल्ह्यात येवला, मालेगाव, बागलाण, चांदवड, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांत टँकरची मागणी वाढत आहे. पावसाच्या पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर आणि कळवण वगळता इगतपुरी, पेठ, सुरगाणा या पावसाळी तालुक्यांत टँकरची मागणी वाढत आहे.

कमी पावसाच्या दुष्काळी तालुक्यात, तर टंचाईचे चित्र अधिकच तीव्र आहे. त्यात, येवला, मालेगाव, चांदवड तालुक्यांत संख्या वाढत आहे. बागलाण तालुक्यातील आठ गावांत अकरा टँकर सध्या सुरू आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चांदवडला सात गावांत १४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. इगतपुरीत १९ गावांना १३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पेठ आणि सुरगाणा तालुक्यांत सात आणि आठ गावांत प्रत्येकी दहा टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

मालेगाव तालुक्यात १५ गावांत १६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक दुर्भिक्ष्य येवला तालुक्यात आहे. २८ गावे आणि १५ वाड्यांसह ५३ ठिकाणांवरील सुमारे ४३ हजारांवर लोकसंख्येला ५० टँकरने सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील निम्मी तहानलेली लोकसंख्या येवला तालुक्यातील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I : भारत-ऑस्ट्रेलिया पुढचा सामना केव्हा? जाणून घ्या तारीख, ठिकाण, वेळ अन् live streaming details

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी होणार मतदान

किती तो वेंधळेपणा! गाडीत बसली, स्टेअरिंग हातात घेतलं पण लगेच खाली उतरली; तेजश्रीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू

Diabetes Breakthrough Discovery: आता रक्तातूनच समजणार डायबिटीजचा धोका; आयआयटी मुंबईतील संशोधकांचा शोध

SCROLL FOR NEXT