नो हॉकर्स झोन फलकाखाली व्यवसाय  esakal
नाशिक

शहरातील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ

- युनूस शेख

जुने नाशिक : महापालिकेकडून (NMC) हॉकर्स झोनची अंमलबजावणी नसल्याने शहरात अतिक्रमणात अधिक वाढ झाली आहे. वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, अपघाताच्या घटना, तसेच शहरास आलेले बकाल स्वरूप, अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.

शहरातील विशेषत: मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, मेन रोड, सराफ बाजार, दहीपूल परिसर, शालिमार, भद्रकाली तसेच रस्त्यांवर दिवसेंदिवस अतिक्रमणाचे प्रमाण वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हॉकर्स झोनची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झालेली नाही. महासभेत वारंवार अतिक्रमणाबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी महापालिकेने हॉकर्स झोन अंमलबजावणी सुरू केली होते. अनेक व्यवसायिकांची नोंदणीही केली होती. तर शहरात हॉकर्स झोन, नो हॉकर्स झोन, अशा दोन भागांत विभागणी केली होती. ठिकठिकाणी फलक लावले होते. त्यानंतर पुढील अंमलबजावणी करणे तर दूर त्याकडे दुर्लक्ष झाले.

नो हॉकर्स झोनच्या फलकाखालीच व्यवसायिकांनी अतिक्रमण (Encroached) करून दुकाने थाटली. एका भागातील दृश्य बघून अन्य भागातील व्यावसायिकांची हिंमत वाढली. त्यांनीही वाटेल त्याठिकाणी अनधिकृत व्यवसाय मांडून अतिक्रमण केले. मुख्य बाजारपेठांमध्ये याचे अधिक प्रमाण आहे. यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे.

शिवाय रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने वाहतूक कोंडी, खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना पार्किंगची समस्या, वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात अशा समस्यांनी डोके वर काढले आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर हॉकर्स झोनचे पुन्हा नियोजन करावे.

ज्याठिकाणी हॉकर्स झोन आहेत, तेथे व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून द्यावी. नोंदणीकृत व्यावसायिकांना प्राधान्य देत उर्वरित जागेवर अन्य व्यवसायिकांना व्यवसायाची संधी द्यावी. त्यांचीही नोंदणी करून घ्यावी. नो हॉकर्स झोनच्या जागेवर असलेल्या अनधिकृत व्यवसायिकांचे अतिक्रमण काढावे. जेणेकरून वाहतूक कोंडीची आणि पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होईल. अपघात होऊन वाद होणार नाहीत. शहराला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल. इतकेच नाही, तर महापालिकेच्या महसुलात भर पडण्यास मदत होईल. त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर हॉकर्स झोनबाबत निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT