A rickshaw whose wheels were stolen from Nanawali area and left on the ground
A rickshaw whose wheels were stolen from Nanawali area and left on the ground esakal
नाशिक

Nashik Crime News : चोरट्यांचा नवा फंडा उभ्या वाहनांच्या चाकांवर डल्ला!

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : नानावली परिसरातून घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांचे चाके चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. संशयित चाके उघडून वाहने जमिनीवर ठेवून पळ काढतात. गेल्या आठ ते दहा दिवसात तीन ते चार वाहनांचे चाके चोरी गेली आहेत. (increasing thieves robbery of vehicle tyres Nashik Crime News)

वाहनांमधील पेट्रोल चोरी जाणे, वाहनांची तोडफोड करत नुकसान करणे, सीट फाडणे अशा प्रकारच्या घटना घडल्याचे अनेक वेळा निदर्शनास आल्या आहेत. काही दिवसांपासून मात्र चक्क उभ्या केलेल्या वाहनांचे रात्रीच्या अंधाराची संधी साधत चाके चोरून नेण्याचे प्रकार घडत आहे.

वाहनांचे संपूर्ण चाके खोलून वाहन जमिनीवर ठेवून संशयित चाके घेऊन लंपास होत आहे. सकाळी वाहन मालकांच्या प्रकार लक्षात येत आहे. परिसरातीलच काही तरुण नशेच्या आहारी जात असे प्रकार करत असल्याचा संशय वाहनधारकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

मोईनुद्दीन सय्यद यांनी शुक्रवारी (ता. १७) रात्रीच्या त्यांची रिक्षा (एमएच- १५- एफयू- ३०४३) घरासमोर उभी केली. शनिवार सकाळी सात वाजता कामावर जाण्यासाठी रिक्षा घेण्यास गेले असता रिक्षाचे तीनही चाके चोरी झाल्याचे आढळून आले.

यापूर्वीही परिसरातील एक रिक्षा आणि एक चारचाकीचे चाके चोरी गेल्याची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये प्रकार अधिक वाढले आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देत अशा प्रकारांना आळा घालावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

"रिक्षाचे तिन्ही चाके चोरी झाले आहे. वाहने उभी करायची किंवा नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी संशयितांना वेळीच आवर घालावा." - मोईनुद्दीन सय्यद, रिक्षामालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT