नाशिक महापालिका
नाशिक महापालिका sakal
नाशिक

नाशिक : अपक्ष नगरसेवक गुरमित बग्गा काँग्रेसचे नवे शहराध्यक्ष?

विक्रांत मते

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी महापालिकेचे अपक्ष नगरसेवक व माजी उपमहापौर गुरमित बग्गा यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. नियमानुसार अपक्ष निवडून आलेल्या व्यक्तींनी राजकीय पक्षात प्रवेश केल्यास त्यांना राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार बग्गा यांनी राजीनामा दिला असून, काँग्रेस शहराध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे.

महापालिकेची स्थापना झाल्यानंतर निवडणुका सुरू झाल्यापासून \बग्गा यांनी महापालिकेचे कामकाज जवळून पाहिले आहे. अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात आहे. सुरवातीपासून ते काँग्रेसमध्ये होते. परंतु, सन २०१२ मध्ये काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. सन २०१७ च्या निवडणुकीतही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले होते. सन २०१२ च्या निवडणुकीत मनसेची सत्ता होती. त्यावेळी अपक्ष तसेच राष्ट्रवादीच्या मदतीने मनसेची दुसऱ्या टर्ममध्ये सत्ता आली होती. त्यावेळी बग्गा यांना उपमहापौरपद मिळाले होते. आता सन २०२२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका होत आहे. त्यापूर्वी काँग्रेसमध्ये त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला आहे. अपक्ष निवडून आल्याने पक्षात प्रवेश करायचा ठरल्यास त्यापूर्वी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा लागतो, असा नियम आहे. त्यानुसार बुधवारी (ता. २७) त्यांनी आयुक्त जाधव यांच्याकडे राजीनामा सादर केला. आयुक्तांनी राजीनामा तत्काळ मंजूर केला.

चमत्कार दिसण्याची शक्यता

बग्गा हे शहराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चेनंतर बग्गा यांनी राजीनामा दिला. बग्गा यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे. त्याचबरोबर अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद व विमल पाटील हे दोघेही काँग्रेसच्या वाटेवर आहे. नाना पटोले यांच्या दौऱ्यात सय्यद यांनी त्यांची भेट घेतली होती. शिवसेनेने भाजपचे अठरा नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला असताना काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नगरसेवक काँग्रेसमध्ये परतू लागल्याने महापालिका निवडणुकीत बग्गा यांच्या नेतृत्वाखाली वेगळा चमत्कार दिसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

चार नगरसेवक पद रिक्त

बग्गा यांच्या राजीनाम्यामुळे महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या १२२ वरून ११८ पर्यंत आली आहे. यापूर्वी भाजपच्या शांता हिरे, शिवसेनेच्या कल्पना पांडे व सत्यभामा गाडेकर यांच्या निधनामुळे जागा रिक्त आहे. आता बग्गा यांनी राजीनामा दिल्याने चार नगरसेवक पदे रिक्त झाली आहेत.

काँग्रेसकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला. परंतु, मतदारांना दिलेला विकासाचा शब्द पाळण्यासाठी थांबलो होतो. आता जबाबदारी पूर्ण झाल्याने राजीनामा दिला. येत्या दोन दिवसात काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहे.

- गुरमित बग्गा, माजी उपमहापौर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT