Kersane: A mother and baby along with the pooja arranged for the traditional fifth puja due to a girl child in a family here esakal
नाशिक

Indian Culture : जुन्या रूढी, परंपरा शहरासह ग्रामीण भागात परंपरा कायम; धावपळीच्या युगात पाचवी पूजनाचे महत्त्व टिकून

गोविंद अहिरे : सकाळ वृत्तसेवा

नरकोळ : यांत्रिक व धावपळीच्या युगातही जुन्या रूढी, परंपरा शहरासह ग्रामीण भागात पाळल्या जात आहेत. त्यातीलच बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी पाचवी पूजन याची प्रथा आजही टिकून आहे. सर्व स्तरातील कुटुंबीय ही प्रथा जोपासत आहे.

सटवाई देवी सरस्वतीच्या रूपात येऊन बाळाला आशीर्वाद देऊन त्याच्या नव्या आयुष्याची सुरवात करते. बाळाला उदंड निरोगी आयुष्य लाभो त्याला आयुष्यभर भाग्याची साथ राहो आणि नशिबी एक सुखी समृद्धी आणि समाधानी दीर्घ आयुष्य येवो यामागील या विधीची आख्यायिका आहे.

वही आणि पेन हे विद्येचे प्रतीक आणि माणूस हा शिक्षणाच्या सहाय्याने यशाची वाटचाल करतो. शेवटी बाळाच्या आयुष्यासाठी केलेली प्रार्थना आणि पूजा याचे भविष्य घडवण्याचा सटवाई मदत करते. (Indian Culture Old tradition follow and celebrate in rural areas along with cities significance of fifth puja of new born baby Nashik News)

प्रसूतीनंतर पाचव्या दिवशी ही पूजा करतात म्हणून पाचवी पूजन असे पारंपरिक रूढी झालेली प्रथा आजच्या धावपळीच्या युगात टिकून असून ग्रामीण भागात जुन्या जानकार महिलांच्या सल्ल्याने विधी पूजा होत आहे. प्रसूतीनंतर पाचव्या दिवशी मांडणी करून पूजेनंतर सटवाई ही बालकाचे भविष्य लेखन करण्यासाठी देवता आहे. पारंपरिक रीतिरिवाज नक्षी काढून पाट सजविण्यात येऊन बाळाची पूजा करून अखंड दिवा तेवत ठेवण्यात येतो.

पूजेसाठी लागणारे साहित्य-

तांब्याची कळशी, नारळ, खोबऱ्याची वाटी, हळद, कुंकू, विड्याचे पाने, खारीक, खोबरे, मीठ, राखाचे संरक्षण बाहुले, देवीचा फोटो, बाळाची खेळणी, काजळ, डबी, आहारात मेथी, पालक, भात, पोळी, वरण पाच पकवाने (खाद्यपदार्थ) आरबोर, सैदळ झाडांची छोटी फांदी.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

-जन्मानंतर बाळाचे उत्सव याप्रमाणे-

-पाचव्या दिवशी पाचवी पूजन सटवाई देवीला बोलविणे

-दहाव्या दिवशी खाट पूजन

-बाराव्या दिवशी नामकरण सोहळा

सटवाई देवीची बाबत

पाचव्या पुजनाच्या दिवशी देवी बाळाचे भविष्य लिखित करते. असा समज ग्रामीण भागात रूढ आहे, त्याच्या भविष्यात सुख दुःखाची घटना घडल्यानंतर हा सटीचा टाक होता असे बोलले जाते.

"बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी हा विधी करून सटवाई देवी बाळाच्या दीर्घ आयुष्यासाठी भविष्य आजमावते. या उद्देशाने हा विधी पारंपरिक पद्धतीने करण्याची प्रथा रूढ आहे. आजही ती पाळली जाते."

- सुनीता सावकार, देवळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT