A crowd of gourmets at the Marathi food festival esakal
नाशिक

Marathi Food Festival : मराठी खाद्यपदार्थ महोत्सवाला इंदिरानगरवासीयांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : इंदिरानगरमध्ये आकर्षण असलेल्या परंतु दोन वर्षे कोरोनामुळे खंडित झालेल्या प्रभाग ३० मधील भाजपप्रणित अजय मित्रमंडळ आणि प्रगती महिला मंडळातर्फे आयोजित मराठी खाद्यपदार्थ महोत्सवाचा इंदिरानगरवासीयांनी मनमुराद आनंद घेतला. (Indiranagar residents flock to Marathi Food Festival nashik news)

माजी नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी आणि मंडळाचे संस्थापक सचिन कुलकर्णी यांच्यातर्फे दरवर्षी हा खाद्यपदार्थ महोत्सव रथचक्र चौकातील अजय मित्रमंडळाच्या प्रांगणात भरविला जातो.

महाराष्ट्रातील कोल्हापूर, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, कोकण आदी भागात प्रसिद्ध असलेल्या चुलीवरची बाजरी आणि ज्वारीची भाकरी, सोबत हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा, सोलकढी, थालिपीठ, शेंगोळे, मुंग भजी, वडा रस्सा, वांग्याचे भरीत, पुरणाची मांडे, विविध प्रकारच्या चटण्या, पापड, लोणचे आदी सत्तर एकाहून एक स्वादिष्ट मराठी पदार्थांवर खवय्यांनी ताव मारला.

यासोबतच ड्रेस मटेरिअल, इमिटेशन ज्वेलरी, साडी, मोत्यांच्या रांगोळी आदी वस्तूंसह घरगुती सजावटीच्या सामानाच्या स्टॉल्सला नागरिकांनी मोठी पसंती दाखवली. दोन दिवसाच्या या महोत्सवात घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला तसेच बचतगटाच्या सदस्य असलेल्या महिलांना चांगली आर्थिक कमाई झाल्याने त्यांनीदेखील समाधान व्यक्त केले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

अत्यल्प दरात स्टॉल्स आणि इतर सर्व व्यवस्था मंडळातर्फे पुरवण्यात आली होती. आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, माजी सभागृहनेते सतीश सोनवणे, माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, यशवंत निकुळे, ॲड. श्याम बडोदे,

ॲड. अजिंक्य गिते, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा आदींसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथे हजेरी लावत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. महिला मंडळाच्या अंजली पाटील, नीता चूळभरे, शैला विसपुते, मंजू पुजारी, रंजना देवरे, मंजू जोशी, सुवर्णा घोडके आदींनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT