Indorikar Maharaj Deshmukh during social awareness in Akhand Harinam week celebration
Indorikar Maharaj Deshmukh during social awareness in Akhand Harinam week celebration esakal
नाशिक

Indurikar Maharaj: सत्य बोलतो म्हणून अडचणीत : इंदोरीकर महाराज

सकाळ वृत्तसेवा

Indurikar Maharaj : शिक्षणाचा दर्जा घसरल्यामुळे कौटुंबिक समस्या वाढल्या आहेत. शेतकऱ्याच्या घरात काम करणारे कमी झाले. यात मजुरांचा दोष नाही. दोन मिनिटांचा राग माणसाला आयुष्यातून संपवितो.

मी नेहमी सत्य व खरे बोलतो. कोणीतरी खरे बोलले पाहिजे. परंतु माझ्या बोलण्याचा उलटा अर्थ लावला जातो. सत्य बोलल्याने अडचणीत येत असल्याचे प्रतिपादन हभप इंदोरीकर महाराज देशमुख यांनी केले.

रावळगाव (ता. मालेगाव) येथे अखंड हरीनाम सप्ताह निमित्त झालेल्या कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. (Indurikar Maharaj statement trouble for speaking truth nashik)

यावेळी इंदोरीकर महाराज म्हणाले, की मी सातत्याने सत्य व खरे बोलत असतो. धर्मासाठी सत्य बोलले पाहिजे. श्रावण महिन्यात महिनाभर उपवास करणाऱ्यांची मला किव येते. एवढे उपवास करून शरीराला त्रास का करून घेता ? सर्व माणसे एकाच देवाचे लेकरे आहेत.

वारकरी संप्रदायात एकच जात आहे, ती म्हणजे माणूस. ८० टक्के लोकांना बापाची संपत्ती सांभाळता येत नाही. सध्या व्यसनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रत्येक गावात जवळपास ९१ टक्के तरुण दारू पितात. ४० टक्के मुले कॉलेजला जात नाहीत.

सध्या मजूर टंचाई सगळीकडे जाणवते. यात मजुरांचा काही दोष नाही. खरे कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या घरातील काम करणारे कमी झाले. पहिली ते नववीपर्यंत परीक्षा नाही.

दहावीतील काही मुलांना इंग्रजी हे नाव सुद्धा इंग्रजीत लिहिता येत नाही. शिक्षणाचा दर्जा घसरल्यानेच कौटुंबिक समस्या वाढल्या आहेत. मोबाईल व सोशल मीडिया धोकादायक ठरत आहे. पळून जाण्यात अल्पवयीन मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे.

व्यसनामुळे तरुण मुलांचा मृत्यू होत आहे. मी व्हॉटसॲप, फेसबुक वापरत नाही. माझ्या बोलण्याचा उलटा अर्थ लावला जातो. रागावर नियंत्रण ठेवून अहंकार सोडा. मिळविण्यापेक्षा टिकविणे महत्त्वाचे आहे. तरुणांनी धर्म आणि संस्कृतीसाठी जगले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांना साथ द्या

इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत विविध विषयांवर भाष्य करत अप्रत्यक्षपणे अनेकांचे चिमटे काढले. हास्याच्या फवाऱ्यातून समाजप्रबोधनाचे पाठ गिरविले. ते म्हणाले, की गावागावात राजकारणात चढाओढ चालते.

वादविवाद होतात. तुम्ही गाव पातळीवर आपसात लढतात. जरा वरचे राजकारण काय चालू आहे ते पहा. कोणी हूं की चूं म्हणत नाही. सध्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. निवडणुकीच्या वेळी गावपातळीवरील पुढारी शेतमळ्यांमध्ये पोचून प्रचार करतात.

निवडणूक काळात सातत्याने संपर्कात असतात. पुढाऱ्यांनो दुष्काळाच्या या परिस्थितीत बांधावर जाऊन बळीराजाला धीर द्या. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा. गावागावातील एकोपा टिकवून ठेवा असे आवाहन त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT