tomato crop rain damage refrence image esakal
नाशिक

Rain Crop Damage : संततधार पावसामुळे टोमॅटोवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

सकाळ वृत्तसेवा

दिंडोरी (जि. नाशिक) : तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या संततधारेमुळे टोमॅटोवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे संपूर्ण टोमॅटो क्षेत्र धोक्यात आले आहे. पावसाळ्यात टोमॅटो पिकाचे आलेला सर्व पैसा द्राक्षासाठी खर्च करतात. सध्या संततधारेमुळे सूर्यदर्शन होत नसल्याने संपूर्ण टोमॅटो क्षेत्र धोक्यात आले आहे. (Infection of tomato with fungal disease due to continuous rain in dindori Nashik Latest Marathi News)

तालुक्यातील पूर्व व पश्चिम भागात ८० ते ९० टक्के शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. या वर्षी होत असलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या टोमॅटोवर काळे डाग पडून टोमॅटो खराब होत आहे. औषधांची फवारणी करूनही त्याचा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हाता-तोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

"या वर्षी जादा पाऊस पडत असल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे." -सुरेश उफाडे, शेतकरी, वरखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT