soyabean seeds.jpg 
नाशिक

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांने अडचणी वाढल्या; शेतकरी दुहेरी अडचणीत

मुकुंद पिंगळे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : खरिपाच्या तोंडावर सोयाबीन बियाणे दरात वाढ झाली. अशा परिस्थितीत पेरणीसाठी नामवंत बियाण्यांची खरेदी केली; मात्र पुढे पेरणी केल्यानंतर बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या अडचणी आल्याने शेतकऱ्यांचे खर्च आणि मेहनत करूनही नियोजन कोलमडले आहे. एकीकडे खर्च वाया गेला, त्यास कंपनी व बियाणे विक्रेत्यांचा प्रतिसाद नाही. त्यामुळे आता या निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे चित्र आहे. 

अद्याप शेतकऱ्यांच्या तक्रारीला प्रतिसाद नाहीच

नाशिक विभागात कृषी विभागाकडे एकूण ४९४ तक्रारी आल्या.त्यापैकी नाशिकमध्ये सर्वाधिक २७२ तक्रारी असून, त्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यात १८५ तक्रारींपैकी ३२ तक्रारी तपासण्या सुरू आहेत. त्यातील सर्वाधिक ५१ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये हा आकडा केवळ सात, तर धुळे जिल्ह्यात एक आहे. त्यात सर्वधिक तक्रारी ३८१ उगवण क्षमतेच्या आहेत. प्राप्त तक्रारींचे कृषी विभागाने जे पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यामध्ये ३८१ तक्रारी तपासणी दरम्यान उगवण क्षमतेच्या आहेत. त्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर आहे. सदोष बियाणे असताना अद्याप शेतकऱ्यांच्या तक्रारीला कंपन्या व बियाणे विक्रेत्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या प्रकरणात न्याय मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

नेमकी परिस्थिती अशी 

शेतकऱ्यांनी बियाणे कंपन्या आणि विक्रेत्यांचे दार ठोठावले 
- अनेकांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र 
- काही कंपन्यांनी तातडीचा प्रतिसाद देत बियाणे दिले बदलून 
- कृषी विभागाने पंचनामे केल्यानंतर अजूनही काही कंपन्या पुढे येत नाहीत 
- काहींनी दुबार पेरण्या केल्या, मात्र पाऊस नसल्याने त्या अडचणीत 

शेतकरी पुन्हा दुहेरी अडचणीत 

गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी व झालेले नुकसान यंदा भरून काढावे, यासाठी नियोजन सुरू असताना शेतकरी दुहेरी कोंडीत सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उशिरा पेरण्यांमधून उत्पादन मिळेल का? वेळेवर पाऊस न झाल्यास ते टिकेल का? असे प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहेत. 

नाशिक विभागातील तक्रारीची स्थिती 

जिल्हा...तक्रारी...कंपन्या...बियाणे बदल..उगवण क्षमता तक्रारी 

नाशिक...२७२...२५...४८...२६५ 

जळगाव...१८५...२६....४७...८० 

धुळे...३७...३...०...३६ 

एकूण...४९४...३६...९५...३८१ 

उगवण अडचण नको म्हणून नामवंत कंपन्यांचे चढ्या भावाने बियाणे घेतले. मात्र ते उगले नाही. बियाणे विक्रेते कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही. आता दुसऱ्यांदा खर्च करून हंगाम उभी करण्याची वेळ आली आहे. - सुरेश देशमुख, शेतकरी, अंदरसूल (ता. येवला)

(संपादन - किशोरी वाघ)


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT