Sesame  esakal
नाशिक

Nashik News : मकर संक्रांतीवर महागाईचे सावट; तिळाच्या दरात प्रती किलो 35 ते 40 रुपयांची वाढ

सकाळ वृत्तसेवा

येसगाव (जि. नाशिक) : सौर मंडळातील सूर्याच्या गतीत बदल झाल्याने यंदा संक्रांत (रविवार ता.१५ ) जानेवारीला आहे. मात्र वातावरणातील बदल व अवकाळी पावसाने तळाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

तिळाच्या दरात प्रती किलो ३५ते ४० रुपयांची वाढ झाल्याने यंदाच्या मकरसंक्रांतीवर महागाईचे सावट आले आहे. (Inflation slows on Makar Sankranti Sesame price increase by Rs 35 to Rs 40 per kg Nashik News)

नवीन वर्षातील पौष पौर्णिमेत येणाऱ्या महिलांचा आवडीचा सण म्हणजे मकर संक्रांत. या सणानिमित्त ' तिळगुळ घ्या गोड गोड बोला 'असे म्हणून अपापसातील स्नेह वाढविण्याचा व जुनी भांडणे मिटवून प्रेमाने राहण्याचा संदेश दिला जातो. सणासाठी घरोघरी तिळगूळच लाडू बनवतात. त्यामुळे ग्रामीण भागात लाडूचा घमघमाट सुटला आहे.

मात्र वातावरणातील बदल व अवकाळी पावसाने तळाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी १६० रुपये प्रतिकिलो दराने बाजारात तीळ विक्रीसाठी होती. यावर्षी मात्र दोनशे ते २५० रुपये दराने प्रतिकिलो विक्री होत आहे. यातच तिळाच्या तयार लाडूचे दर देखील २५ टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील विकतच्या तीळ घेऊन लाडू बांधावे लागले आहेत.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

बाजारपेठा सज्ज

मकरसंक्रांत सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यानिमित्त बाजारपेठेत तिळगुळ, काळे वस्त्र, रेवड्या, हलव्याचे पदार्थ, दागिने आदींना चांगले मागणी आहे. मकर संक्रांतीमुळे सर्वांमध्ये उत्साह संचारला आहे.

ग्रामीण भागात यंदाही सणासाठी खरेदीसाठी धावपळ होताना दिसून येत आहे. या दिवशी तिळाचे पदार्थ खातात. तिळाचे उटणे लावून स्नान करतात तसेच महिला पाच बोळकी आणून त्यात गहू , बोरे , हरभरा सारख्या पाच वस्तू,तिळगुळ टाकून हळदीकुंकू लावून ते कपड्याने झाकून एकमेकींना वाण देतात.

संक्रातीच्या दुसऱ्या दिवसाला कर म्हणतात. कर म्हणजे किंक्रांत या दैत्याचा देवांनी वध केला. यावरून या दिवसाला हे नाव पडले. त्या दिवशीही महिला एकमेकीकडे हळदी कुंकूला जातात, ओटी भरण, नदीवर स्नान करणे शुभ मानतात. ग्रामीण भागात घराघरांत हा सण साजरा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT