Speed Braker
Speed Braker esakal
नाशिक

Nashik : निकृष्ट गतिरोधकामुळे निष्पापांचा बळी? नाशिक- कळवण रस्त्यावरील वलखेड फाटा बनला अपघातांचे ठिकाण

सकाळ वृत्तसेवा

Nashik : नाशिक - कळवण रस्त्यावरील वलखेड फाटा हा अपघातग्रस्त बनल्याने तेथे गतिरोधकाची मागणी करण्यात आली होती. गतिरोधक टाकण्यात आले परंतु पाहिजे त्या प्रतीचे गतिरोधक नसल्याने दोन ते तीन महिन्यातच उखडून गेले.

त्यामुळे पुन्हा एकदा अपघाताची संख्या वाढली आहे. वणी येथील प्राध्यापकाचा सेवानिवृत्तीच्या पूर्वसंध्येला बळी गेल्याने संताप व्यक्त केला जात असून आणखी किती जणांचे बळी गेल्यावर संबंधित विभाग चांगल्या प्रतीचे गतिरोधक टाकेल, असा संप्तत सवाल विचारला जात आहे. (Innocent victims of poor traffic Valkhed Fata on Nashik Kalwan road become site of accidents)

नाशिक - कळवण रस्ता चोवीस तास रहदारीचा आहे. रुंदी कमी असल्याने या रस्त्याला राज्य मार्गातून वगळून राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही केली जात आहे. परंतु ती पूर्ण होण्यासाठी केवळ आश्‍वासने मिळत आहे.

त्यात पिंपळणारे फाटा, खतवड फाटा, अक्राळे फाटा, वनारवाडी फाटा, वलखेड फाटा, लखमापूर फाटा आदी ठिकाणे ही अपघातग्रस्त बनलेली आहे. येथे वाहनांचा वेग कमी व्हावा, यासाठी गतिरोधक टाकण्याची वारंवार मागणी केली जाते.

वलखेड फाटा अपघातग्रस्त बनल्याने तेथे गतिरोधकाची मागणी करण्यात आली. आंदोलनाचाही इशारा देण्यात आला. त्यानंतर संबंधित विभागाकडून गतिरोधक टाकण्यात आले, परंतु अवजड वाहनांचा अंदाज घेऊन ते गतिरोधक टाकण्यात आले नाही.

फक्त जनतेची ओरड म्हणून तात्पुरत्या स्वरूपाच्या फायबरचे गतिरोधक बसवून संबंधित विभागाने चालढकल केली. त्याचा परिणाम तीन महिन्यातच ते गतिरोधक निखळून नष्ट झाले. त्यामुळे पुन्हा या फाट्यावरून वाहने वेगाने जाण्यास सुरवात झाली.

परवा वणी येथील एका प्राध्यापकाचा याच कारणामुळे मृत्यू झाला. चांगल्या प्रतीचे, तंत्रशुद्ध गतिरोधक असते तर तो मृत्यू ओढवला नसता. रोज लहान मोठे अपघात होणे हे नित्याचे झाले आहे. वलखेड फाट्यावर अपघात हे नित्याचेच झाले आहेत. अनेकांना या फाट्यावर अपंगत्व तसेच मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या फाट्यावर गतिरोधक बसवावा, अशी मागणी जनतेतून आली होती.

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर निकृष्ट प्रतीचे गतिरोधक बसवून वेळ मारुन नेण्याचे काम संबंधित विभागाने केले. निष्पाप लोकांच्या मृत्यूस जबाबदार म्हणून कोणाला धरावे? निकृष्ट गतिरोधक बसवले म्हणून संबंधित विभागाला दोष द्यावा की लोकप्रतिनिधींनी याकडे डोळेझाक केले म्हणून लोकप्रतिनिधींना जबाबदार धरावे? दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये १६-१ हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दिशादर्शक फलक हवेत नाशिक -वणी या रस्त्यावर दिशादर्शक फलक, झेब्रा पट्टा निशाणे अथवा रेडियम पट्टे आदी बसविण्याची मागणी वारंवार होत असल्याने याकडे कुणीच गांभीर्याने लक्ष देत नाही. या ठिकाणी दिंडोरीकडून येताना दोन वळणे, चढउतार रस्ता असल्याने वाहनांची गती जास्त असते.

तसेच दिंडोरीकडे जातांना उतार मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहनांधारकांना समोरील वाहन सहसा कळत नाही. त्यामुळे याठिकाणी आता पर्यंत अनेक लहान मोठे अपघात झालेले आहे.

"वलखेड फाट्यावर अवजड वाहनांचा विचार करून गतिरोधक बसवले असते तर निष्पापांना आपला जीव गमवावा लागला नसता. परंतु चालढकल कारभारामुळे लोकप्रतिनिधींचाही प्रशासनावर वचक राहिलेला नाही, हे सिद्ध होते. संबंधित विभागाने याची दखल घेत त्वरित चांगल्या प्रतिचे गतिरोधक बसवावेत, अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. निष्पाप लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरूनही जर संबंधित विभाग या घटनेला गांभीर्याने घेत नसेल तर संबंधित विभागाच्या विरोधात जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. "

- रामदास चारोस्कर, माजी आमदार दिंडोरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT