Dr. Varsha Patil & Kumal darade esakal
नाशिक

Innovation: गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीची मिळणार पूर्व सूचना! नाशिकमधील संशोधकांना मिळाले राष्ट्रीय पेटंट

सकाळ वृत्तसेवा

Innovation : यात्रेसह वेगवेगळ्या कारणांनी होणारी जनतेची गर्दी आणि त्यामुळे होणारी चेंगराचेंगरी गंभीरच आहे...कुठेही चेंगराचेंगरी होणार अशी पूर्वसूचना मिळू लागली तर नक्कीच उद्भवणाऱ्या आपत्तीला ब्रेक लावता येईल...हे अशक्य वाटत असले तरी ते शक्य होऊ शकणार आहे.

कारण चेंगराचेंगरीच्या संदर्भातली पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित होऊन आनंददायक गोष्ट म्हणजे या संशोधनाला राष्ट्रीय पेटंट मिळाले आहे. (Innovation get advance warning of stampede in crowded places Researchers from Nashik got national patent)

मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एकलहरे-नाशिक येथील उपप्राचार्या प्रा. डॉ. वर्षा पाटील व प्रा. डॉ. स्वाती भावसार यांनी संशोधन करून अँटी स्टेमपेड अलर्ट डिव्हाईस (ASAD) म्हणजे चेंगराचेंगरी टाळण्याबाबत सूचना देणारी यंत्रणा विकसित केली असून त्याला भारत सरकारच्या पेटंट विभागाकडून मान्यता मिळाली आहे. या यशाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

या संशोधनाविषयी माहिती देताना डॉ. वर्षा पाटील यांनी सांगितले की, अशा प्रकारची आधुनिक यंत्रणा ही भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.

संशोधनाच्या मागची पार्श्वभूमी बघितली असता नाशिकमध्ये मागील कुंभमेळ्यात झालेली दुर्दैवी चेंगराचेंगरी अथवा एलफिस्टन रोड मुंबई स्थानकात झालेली चेंगराचेंगरीची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे.

अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये, याकरिता तंत्रज्ञानाचा आधार घेतला गेला पाहिजे व मनुष्यहानी टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हा विचार मनाशी पक्का करून मागील पाच वर्षापासून अशा प्रकारच्या चेंगराचेंगरी टाळण्यासाठी यंत्रणा विकास करण्याचे काम हाती घेऊन त्यावर प्रयोग सुरू होते.

या संशोधनाद्वारे गर्दीच्या ठिकाणी गर्दी होण्यापूर्वी सूचना मिळू शकते. (लाल दिवा,अलार्म,मोबाईल अलर्ट) तसेच मोबाईल अँपद्वारे त्यांना गर्दीची पूर्वसूचना आधीच मिळते. ही नवसंशोधित प्रणाली विविध ठिकाणी फार उपयुक्त ठरणारी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बसस्थानक, रेल्वे स्टेशन, विमानतळे विविध प्रकारच्या मंदिरांमध्ये तसेच यात्रांच्या ठिकाणी व सर्व गर्दीची ठिकाणावर उपयोग होऊ शकतो. पोलिस दल, अग्निशामक दल, रेल्वे सुरक्षा दल, एनडीआरएफ अशा सर्व विभागांना तसेच नागरिकांना योग्य वेळी सतर्क करण्याचे काम ही यंत्रणा करू शकते, त्यामुळे उपयुक्तता जास्त आहे.

संशोधकांनी या उपकरणाचा व्यवसाय उपयोग करण्याचाही मानस व्यक्त केला आहे. मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे, संस्थेचे सचिव कुणाल दराडे, प्राचार्य डॉ. गजानन खराटे व विभागप्रमुख यांनी डॉ. वर्षा पाटील आणि डॉ. स्वाती भावसार यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

“जगाला आणि समाजाला आमचा संशोधनाचा उपयोग व्हावा.भविष्यात आपत्तीच्या अशा घटनांमुळे होणारी प्राणहानी टाळावी अशी अपेक्षा.या संशोधनाचा हेतू हा सामान्य माणसाला होण्यासाठी कमीत कमी खर्चात व्हावा या साठी आम्ही प्रयत्नशील आहे.”

- डॉ. वर्षा पाटील, संशोधक

“मातोश्री शिक्षण संस्थेमध्ये संशोधनाला कायमच प्रोत्साहन दिले जाते.प्रा.डॉ.वर्षा पाटील यांनी केलेले संशोधन कौतुकास्पद आहे.त्यांचे कार्य हे नवीन संशोधकांना प्रेरणादायी ठरेल.या संशोधनाला राष्ट्रीय पेटंट मिळाल्याने आनंद झाला.”

- कुणाल दराडे, सचिव, मातोश्री शिक्षण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

SCROLL FOR NEXT