retired teacher jagannath Jadhav esakal
नाशिक

नाशिक : काटवनच्या माळरानावर फुलवले कोकण!

घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : सोळा प्रकारच्या आंब्याच्या (Mango) प्रजातींची बाग, सोबतीला नारळ, चिंच, आवळा, रामफळ, सीताफळ,जांभूळ, फणस, खजूर, सुपारी, अंजीर, साग हे कुण्या जंगलाचे वर्णन नसून चिंचवे (ता. मालेगाव) येथील निवृत्त शिक्षकाच्या (Retired Teacher) अभ्यासूवृत्ती व अपार कष्टाने चक्क माळरानावर कोकणसदृश (Konkan) नंदनवनाची ही गोष्ट! दुष्काळी परिसर अशी ओळख असलेल्या काटवन भागात पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने लागवड व शुद्ध फळे निर्मितीच्या आदर्शवत प्रयोगाचे सर्वत्र कौतूक होत आहे. (Innovative experiment of retired teacher Nashik News)

शहरापासून ३५ किमी दूर असलेल्या चिंचवे (गा) या गावकुसावर अकरा वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यावर जगन्नाथ जाधव यांनी वृक्षराजी फार्म विकसित केला. अभ्यासासाठी राज्यभरातील आंब्याच्या बागा नजरेखालून घातल्या. डोंगराच्या कुशीत गोरखदरा शिवारात राहुरी विद्यापीठाचा केशर, देवगडचा हापूस, हैदराबादचा केसर, उत्तरप्रदेशचा दशहेरी, भीमाशंकर जंगलातील रंगीबेरंगी आंब्यासह तोतापुरी, बहुगुणी शेवपा, राजापुरी, आम्रपाली, कलमी, अस्सल गावरानच्या प्रजातींसह विविध सोळा प्रकारच्या आंब्याची रोपे रुजवत बाग फुलवण्यात आली आहे. गावी वास्तव्य करणारा पुतण्या सतीश जाधव याची मदत घेत माळरानावर कोकण फुलवला आहे. या नैसर्गिक शेतीला राज्यभरातून प्रयोगशील शेतकरी वर्षभर भेटी देतात.

मालेगावी ज्युनिअर कॉलेजला इतिहास विषयाचे शिक्षक जगन्नाथ जाधव अकरा वर्षांपूर्वी निवृत्त झाले. सोयगावच्या पारिजात नगरात वास्तव्य करणारे जाधव दांपत्य! पत्नी शोभा ह्या गृहिणी आहेत. काळ्या मातीची सेवा करण्याच्या प्रचंड इच्छाशक्तीने सत्तरीचे वय तरुणांनाही लाजवत आहे. मुलगा ज्ञानेश्‍वर सपत्नीक मुंबई हायकोर्टात वकिली करतोय. विवाहित मुलगी गायत्री पगार पुण्यात शिक्षिका आहे. तर नोकरीनिमित्त ओमान येथे गेलेल्या थोरला मुलगा योगेशचे गेल्यावर्षी कोरोनाने निधन झाल्याने परिवारावर संकट कोसळले. धीरोदात्तपणे दुःख पचवत जाधव दांपत्याने फळबाग लागवडीचा ध्यास घेतला आहे. निसर्गाशी घट्ट नाते सांगणारी, काटवन भागाचे भूषण बनलेली गर्द- हिरवाई आदर्श बनली आहे. लोणच्याची कैरी व नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा व्यापाऱ्यांना न देता स्वतःच विक्रीचा मार्ग निवडला आहे. ‘पिकवेलही अन्‌ विकेलसुद्धा’ या युक्तीनुसार ‘जगन्नाथाचा रथ’ जाधव दांपत्य ओढत आहे, हे विशेष!

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे...’

या कोकणसदृश्य हिरव्यागार रानात ओमान देशातील खजुराची रोपे वाढत आहेत. पाणीदार नारळ, फणस, सुपारी, तसेच चिंच, जांभूळ, आवळा, अंजिर, रामफळ, सीताफळ यांची वनराई सजली आहे. वृक्षराजीमुळे चिमणी कावळा, मोर, पोपट, कबुतर, बगळे, घुबड, घार, पिटूकळे, ससाणा, व्हलगी, लाव्हरी, तीतूर, साळुंकी अशी शेकडो दुर्मिळ पक्ष्यांची शाळा इथे भरते. आंब्याच्या बागेत दिवसरात्र वानरांच्या झुंडी तसेच खार, उंदीर, मुंगूस, साळिंदर यांचा मुक्तसंचार असतो. फळाबागेचे मोठे नुकसान होत असते. परंतु, निसर्गाचे आपण देणे लागतो या भावनेने जाधव काका- पुतण्याची जोडी प्राणी, पक्ष्यांसाठी नित्यनेमाने पिण्याच्या पाण्याची सोय करतात. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’चा संत तुकोबांचा नि:स्वार्थ भाव या माळरानावर अनुभवयास येतो. निसर्गतः वाढलेली कडुलिंबाची झाडे, अस्सल गावरान आंब्याच्या मोसमी शाखा व वर्षभर फळ देणारे सदाबहार आंबा वृक्ष येथील खास आकर्षण होय. पाझर तलावाच्या पायथ्यालगतच्या विहिरीवर बाग जगवली आहे. परिसरात बिबट्याचा संचार असल्याने टेहळणी व निवाऱ्यासाठी टॉवर खोली बनवली आहे.

"लागवड ते उत्पादन या दरम्यान रासायनिक फवारणी न करता पूर्णतः नैसर्गिक शेती प्रयोगातून शासकीय मदतीशिवाय ही बाग उभी आहे. शुद्ध फळांना राज्यभरातून मागणी असते."

- जे. डी. जाधव, फळबाग उत्पादक, चिंचवे (गा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT