Gaya Prasad, Deputy Director General of the Government of India while interacting with the Gharkul beneficiaries of Khambale village on Monday
Gaya Prasad, Deputy Director General of the Government of India while interacting with the Gharkul beneficiaries of Khambale village on Monday esakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्यातील घरकुलांची पथकाकडून पाहणी! अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याच्या यंत्रणेला सूचना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांची सोमवारी (ता.२९) पाहणी उपमहानिदेशक गया प्रसाद, ग्रामविकास विभागाचे राज्याचे सचिव एकनाथ डवले यांनी केली.

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात किती घरकूल मंजूर आहेत, किती घरकूल पूर्ण झाले, अपूर्ण घरकूल याचा सविस्तर आढावा यावेळी घेत अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. (Inspection of gharkul houses in district by team Instructions to system for timely completion of incomplete works Nashik News)

यात सन २०१६-१७ ते २०२१-२२ या आर्थिक वर्षांतील मंजूर ८९ हजार २७६ कामांपैकी ८३ हजार ५१२ घरकूल कामे पूर्ण असल्याचे सांगण्यात आले. सरासरी हे काम ९३.५४ टक्के आहे. उर्वरित घरकुलांचे बांधकाम सुरू असून लवकर पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

गयाप्रसाद, सचिव डवले यांनी घरकूल प्राप्त लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात प्रमुख्याने महिलांशी चर्चा केली.

घरकूल मिळताना अडचणी आल्या का? अशी विचारणा त्यांनी केली. ठेकेदारांनी कामे अर्धवट ठेवली आहेत का, अशीही विचारणा करण्यात आली. सर्व घरकुलांची कामे वेळात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले.

पीएम जनमन योजनेतंर्गत मंजूर झालेली घरकूल किती आहेत, याचा आढावा यावेळी झाला. जिल्ह्यात साधारण: २६०० घरकूल या योजनेतंर्गत होणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे उपस्थित होते.

५ फेब्रुवारीला भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ५ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे महिला बचत गटांचा कार्यक्रम होत आहे. यात मोदी आवास योजनेतंर्गत घरकुलांचे भूमिपूजन होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान आवास योजनेतंर्गत कामांची तपासणी सुरू असून भारत सरकारचे उपमहानिदेशक गया प्रसाद यांनी नाशिक जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सुरू असलेल्या घरकूल बांधकामांची पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT