Members of social network forum distributing sports dress and educational materials to students of Zilla Parishad Primary School esakal
नाशिक

Inspirational: संगमनेर गावच्या चाकरमान्यांचा ज्ञानमंदिरासाठी उपक्रम! क्रीडाविषयी गोडीसाठी दिले प्रोत्साहन

दिगंबर पाटोळे

Inspirational : आपल्या जन्मभूमीच्या विकासात तसेच आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी, गावातील विद्यार्थ्यांसाठी आपण काही हातभार लावावा या उद्देशाने संगमनेर (ता. दिंडोरी) येथील चाकरमान्यांचा ग्रुप असलेल्या सोशल नेटवर्क फोरमने जिल्हा परिषद शाळा आणि रामनगर येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस वितरण नुकतेच केले.

दहावी -बारावी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच दक्षिण कोरिया येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिल्वर मेडल मिळविणाऱ्या मंगल बागूल- गावित यांचा सत्कार करण्यात आला. (Inspirational Activities of Sangamner Village Chakarmanyas for Gnanmandir Encouraging interest in sports nashik)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस, शैक्षणिक साहित्य वाटप व विद्यार्थी गुणगौरवाच्या अध्यक्षस्थानी गावचे भूमिपुत्र आदिवासी बचाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य अशोक बागूल होते.

प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर पाटोळे, पोलिस पाटील दामोदर बागूल, उपसरपंच हिरामण जाधव, पेसा समिती अध्यक्ष निवृती गायकवाड, पोपट चौरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप भोये, प्रा. नामदेव गावित, वंदनाताई पवार, कमलाकर पवार, सामाजिक कार्यकर्ते जमीर शेख, अमोल गावित, संदीप जगताप, मच्छिंद्र मोरे आदींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच धावपटू मंगलताई बागूल यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

विद्यार्थांना स्पोर्ट ड्रेस, नोटबुक, पहिली ते दुसीरीच्या विद्यार्थ्यांना चांगल्याप्रतीची पाटी व पेन बॉक्स आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. दिगंबर पाटोळे, प्रा. अशोक बागूल यांनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धावपटू मंगलताई यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी रवींद्र ठाकरे, उत्तम वडजे, रतन जाधव, प्रवीण राऊत तसेच सोशल नेटवर्किंग फोरमचे रमेश साबळे, सुनील बागूल, नाना गायकवाड, अंबादास चौधरी, कृष्णा पवार, केशव बागूल, गायकवाड, कणसरा ग्रुपचे स्वयंसेवक, गावातील तरुण, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक भगवान जोपळे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन केले. श्री. धादवड यांनी आभार मानले.

"आमचा ग्रुप ज्ञान मंदिरासाठी निधी देण्यासाठी तत्पर असतो, मागील वर्षीही संगमनेर व रामनगर जिल्हा परिषद शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांचे सर्व शैक्षणिक साहित्य, बूट, सॉक्स, गणवेशाचे वाटप केले होते. यावर्षी विद्यार्थ्यांना क्रीडाप्रकारात प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांना स्पोर्ट ड्रेस व शैक्षणिक साहित्याचे आमच्या सोशल नेटवर्क फोरमने वाटप केले." - प्रा. अशोक बागूल, सोशल नेटवर्क फोरम, संगमनेर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT