Virat Sonwane while giving food to the destitute and mentally ill on the streets of Malegaon city. esakal
नाशिक

Inspirational News: सोनवणे दांपत्य भागवतात निराधारांची भूक! माणुसकीच्या नात्याने मदतीचा प्रयत्न

राजेंद्र दिघे

Inspirational News : समाजात वाटा हिस्सा व संपत्तीसाठी होणारा रोजचा संघर्ष असताना सकारात्मक जगणारी माणसे नक्कीच खूप काही शिकवून जातात.

आजच्या जमान्यात घरातील व्यक्तीचे पालनपोषण करणे अवघड असताना महागाईच्या वणव्यात अनोळखी व्यक्तींची भूक शमविण्यासाठी मालेगाव येथील सोनवणे दाम्पत्याची धडपड कौतुकास्पद आहे.

धडधाकट व रोजच्या रहाट गाडग्यातील माणसे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी गोपाळ सोनवणे व त्यांची पत्नी रेखा हे मागील काही महिन्यांपासून शहरातील विविध भागातील निराधार, मनोरुग्णांना एका वेळेच जेवण देऊन त्याची भूख भागवीत आहे. (Inspirational News Sonawane family satisfies hunger of destitute humanitarian effort to help nashik)

भाजीपाला आडत दुकानात काम करणारे गोपाळ सोनवणे एकदा रस्त्याने जात असताना रस्त्यावर असाच एक जण रस्त्यावर काही तरी खाताना दिसला. काही वर्षांपूर्वी त्यांचे बंधू घरातून निघून गेलेले.

त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही ते मिळून आले नाही तसेच ते घरी देखील परतले नाही. घरातील माणूस जेव्हा दूर जातो ते दुःख त्या कुटुंबातील माणसांनाच जाणवते.\

याच भावनेतून रस्त्यावर अशाच पद्धतीने फिरत असलेल्या प्रत्येक लोकांमध्ये त्यांना आपला भाऊ दिसतो. त्यामुळे श्री. सोनवणे व त्यांच्या मुलगा विराट यांनी अशा लोकांसाठी काहीतरी देण्याच्या उद्देशाने त्यांना एकवेळचे जेवण देण्याचा उपक्रम होती घेतला .

यासाठी त्यांचे सर्व कुटुंब त्यांना मदत करते. सोनवणे कुटुंब हे दररोज वीस-बावीस लोकांचे एकवेळचे जेवण घरी बनवून ते सोयगाव, टेहरे चौफुली, सटाणा नाका, मोसमपूल, रामसैतु, जुना बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, नवीन बस स्थानक उड्डाणपुल, किदवाई रोड, सरदार चौक, शनी मंदिर, गुरुदत्त मंदिर संगमेश्वर, एकात्मता चौक, मोची कार्नर, रावळगाव नाका कॉलेज स्टॉप सोयगाव या परिसरातील रस्त्यावर असेच एकटे लोकांपर्यंत तसेच मनोरुग्ण लोकांना पोचवता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हे काम करताना कुठल्याही प्रकारचा त्रागा न करता घरची परिस्थिती बेताचीच असूनही वयोवृद्ध वडील संतोष सोनवणे, आई अहिल्याबाई यांची व पत्नीची मदत होते. गोपाळ स्वतः एक कामगार असताना माझा भाऊ असता तर ही भावना घेऊन हा भार सोसत आहेत.

स्वतः पदरमोड करून सुरू केलेलं काम अनेकांना प्रेरणादायी आहे एवढ्यावरच न थांबता त्यांच्या या प्रयत्नांना मदतीची किनार समाजातील अनेक घटक द्यायला इच्छुक असून 'देवाज् आशियाना' या नावाने निवारा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

"निराधार, मनोरुग्ण ही कोणाची तरी माणसे असतात. समाजात आजही प्राणी मात्रांवर प्रेम करणारी अनेक जण आहेत. अशा आपल्यातील माणसांसाठी माणुसकी नावाचा धर्म ठेवून मदतीचा हात देण्याचा हा प्रयत्न आहे." - गोपाळ सोनवणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT