Water scarcity esakal
नाशिक

NMC Water Scarcity Plan : पाणीटंचाई आराखडा सादर करण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

Water Scarcity Plan : पाणीकपातसंदर्भात मुख्य सचिवांकडे झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी २१ एप्रिलपर्यंत संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा उपाययोजनांसह सादर करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. (Instructions for submission of Water Scarcity Plan nashik news)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

‘अल निनो’ वादळामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाणी संकट निर्माण होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत पाणी जपून वापरण्यासाठी राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीटंचाईचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या.

नाशिक महापालिकेकडून राज्याच्या मुख्य सचिवांकडे आराखडा सादर करण्यात आला. त्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून एक दिवस, तर जुलै व ऑगस्ट महिन्यात आठवड्यातून दोन दिवस असे पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परंतु मुख्य सचिवांनी विभागीय आयुक्तांकडे निर्णय घेण्याचे अधिकार सोपविले. त्यानुसार महापालिकेला विभागीय आयुक्त गमे यांनी पत्र पाठवून २१ एप्रिलपर्यंत पाणीकपातसंदर्भात तयार केलेल्या उपाययोजनांचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेकडून अहवाल सादर झाल्यानंतर साधारण मे महिन्यापासून पाणी कपात होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कॉकरोच जनता पार्टी'ची पाकिस्तानात क्रेझ! पाकमध्येही 'कॉकरोच पार्टी', देशाच्या गृहमंत्र्यानेच सरकारला दिला 'हा' इशारा

Deglur Accident: देगलूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

SCROLL FOR NEXT