ambulance 987.jpg 
नाशिक

शहरातील खासगी रुग्ण व शववाहीका ताब्यात घेण्याच्या सुचना...जीपीएसद्वारे होणार ट्रॅकिंग

विक्रांत मते

नाशिक : कोरोना रुग्ण व कोरोनामुळे मृतांची संख्या वाढत असताना रुग्णवाहीका व शववाहीका उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर खासगी वाहीका ताब्यात घेण्याबरोबरचं घंटागाडी प्रमाणेच त्यावर जीपीएस यंत्रणा बसविण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वाढती संख्या लक्षात घेवून महापालिकेच्या तीस प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ॲम्बुलन्स तैनात करण्याच्या सुचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत. 

नागरिकांना तत्काळ मदत मिळण्यास मदत
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतं असल्याच्या पार्श्‍वभूमीवर विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. कोव्हीड सेंटर, तपासणी अहवालाची माहिती घेताना नागरिकांकडून रुग्ण व शववाहीका मिळतं नसल्याच्या तक्रारींची दखल घेत आयुक्त गमे यांनी खासगी वाहीका ताब्यात घण्याच्या सुचना दिल्या आहेत. प्रत्येक रुग्ण व शववाहीकेवर आता घंटगाडी प्रमाणेचं जीपीएस यंत्रणा लावली जाणार आहे. जेणेकरून वाहनांचे ट्रॅकींग करून त्याद्वारे नियंत्रण ठेवता येणार आहे. शहरात महापालिकेचे तीस प्राथमिक आरोग्य केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर ॲम्बुलन्सची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक ॲम्बुलन्स वर कॉल सेंटरचा क्रमांक दिला जाणार असून त्याद्वारे नागरिकांना तत्काळ मदत मिळण्यास मदत होईल. 

ऑक्सिजन बेडमध्ये वाढ 
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या मेडीकल कॉलेज मध्ये नव्याने ९० ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात आले तर नाशिकरोडच्या नवीन बिटको रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड कार्यन्वित करण्यात आले आहेत. तपोवन व माहेश्‍वरी हॉस्टेल मध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्याच्या सुचना देण्यात आल्या. रॅपिड ॲण्टीजेन टेस्टचा रिपोर्ट पालिकेच्या वेब पोर्टल आता नियमित टाकला जाणार असून समाजकल्याण, मेरी, वडाळा व गंगापूर येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये तपासणी साठी आलेल्या रुग्ण परत गेल्यास संबंधित अधिकायावर जबाबदारी निश्‍चित केली जाणार आहे. 

प्रतिबंधित क्षेत्रात चेअरमनची जबाबदारी 
शेवटचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यापासून त्यापुढे चौदा दिवस प्रतिबंधित क्षेत्र आता राहणार आहे. त्याचबरोबर प्रतिबंधित क्षेत्राची दररोज पाहणी करण्याची जबाबदारी नोडल अधिकायांवर राहील. एखाद्या ईमारती मध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास ईमारत क्षेत्र सॅनिटाईज करण्याबरोबरचं फलक लावणे, क्युआर कोड लावणे आदी प्रकारची जबाबदारी आता सोसायटीच्या चेअरमनला पार पडावी लागणार आहे. 

रुग्णालयांवर गुन्हे दाखल 
रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा दराने बिल आकारणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने पालिकेने ४१ लेखा परिक्षक खासगी रुग्णालयांमध्ये तैनात कले आहे. परंतू त्यांच्याकडे सेंट्रल बेडचा अहवाल प्राप्त होत नसल्याने लेखा परिक्षकांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला तर बिलांमध्ये तफावत आढळल्यानंतर नोटीस काढून त्वरीत गुन्हे दाखल करण्याच्या सुचना आयुक्त गमे यांनी दिल्या. 

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati OBC Politics: ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणुकीत उतरले; सुनेत्रा पवारांना थेट आव्हान

Mumbai News: प्राण्यांसाठी विशेष ‘कूलिंग’ व्यवस्था, राणी बागेत वाढत्या उष्णतेचा तडाखा; प्रशासन सतर्क

'अश्लिल साइटवर माझा फोटो पाहिला आणि...' 15 व्या वर्षीच जान्हवी कपूरला आलेला वाईट अनुभव, म्हणाली...'एका दुसऱ्याच शरीराला...'

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT